महाराष्ट्र

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी; मध्य रेल्वेकडून २० अतिरिक्त गणपती विशेष गाड्या जाहीर; ७ ऑगस्टपासून आरक्षण

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी गर्दी लक्षात घेत, मध्य रेल्वेने आणखी २० अतिरिक्त फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

Swapnil S

मुंबई : मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेने गणेशोत्सवानिमित्त सोडलेल्या गाड्यांचे आरक्षण फुल झाले आहे. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी गर्दी लक्षात घेत, मध्य रेल्वेने आणखी २० अतिरिक्त फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांचे आरक्षण ७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. गणपती उत्सवासाठी मध्य रेल्वेने आतापर्यंत २२२ गणपती विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत.

लोकमान्य टिळक टर्मिनस - रत्नागिरी द्विसाप्ताहिक विशेषच्या ८ फेऱ्या होतील. ०१०३१ विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ६ सप्टेंबर, ७, १३, १४ सप्टेंबर रोजी ८ वाजता सुटेल. रत्नागिरी येथे दुसऱ्या दिवशी ४:५० वाजता पोहोचेल. ०१०३२ विशेष गाडी रत्नागिरी येथून ७ सप्टेंबर, ८, १४, १५ सप्टेंबर रोजी सकाळी ८:४० वाजता सुटेल. लोकमान्य टिळक टर्मिनस येथे त्याच दिवशी ५ :१५ वाजता पोहोचेल. ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड येथे थांबेल.

पनवेल-रत्नागिरी साप्ताहिक विशेषच्या ४ फेऱ्या होतील. ०१४४३ विशेष गाडी पनवेल येथून ८ आणि १५ रोजी ४:४० वाजता सुटेल. रत्नागिरी येथे त्याच दिवशी ११:५० वाजता पोहोचेल. ०१४४४ विशेष गाडी रत्नागिरी येथून ७ आणि १४ रोजी ५:५० वाजता सुटेल. पनवेल येथे दुसऱ्या दिवशी १:३० वाजता पोहोचेल. पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड येथे थांबेल.

पुणे-रत्नागिरी साप्ताहिक विशेषच्या ४ फेऱ्या होतील. ०१४४७ विशेष गाडी पुणे येथून ७ आणि १४ रोजी ००:२५ वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी ११:५० वाजता पोहोचेल. ०१४४८ विशेष गाडी रत्नागिरी येथून ८ आणि १५ रोजी ५:५० वाजता सुटेल. पुणे येथे दुसऱ्या दिवशी ५:०० वाजता पोहोचेल. चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड येथे थांबेल.

पनवेल-रत्नागिरी साप्ताहिक विशेषच्या २ फेऱ्या होतील. ०१४४१ विशेष गाडी ११ रोजी ४:४० वाजता पनवेल येथून. आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी ११:५० वाजता पोहोचेल. ०१४४२ विशेष गाडी १० रोजी ५:५० वाजता रत्नागिरी येथून सुटेल. पनवेल येथे दुसऱ्या दिवशी १:३० वाजता पोहोचेल. पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड येथे थांबेल. पुणे-रत्नागिरी साप्ताहिक विशेषच्या २ फेऱ्या होतील.

'४८ तासांत राजीनामा द्या, अन्यथा देशव्यापी आंदोलन'; CJP च्या अभिजीत दिपकेंचा ज्ञानेश कुमार यांना इशारा

Mumbai : गणपती विसर्जनासाठी उद्या कुठे वाहतूक बंद? लोकल, मेट्रो आणि पार्किंगबाबतही महत्त्वाचे अपडेट

Ganeshotsav 2026 : 'मुंबईचा राजा' चा यंदा अनोखा विसर्जन सोहळा; २२ फुटांचा गणराया जहाजाने खोल समुद्रात जाणार

Pune : गणपती विसर्जनासाठी वाहतूकीत मोठे बदल; ४८ तास अवजड वाहनांना प्रवेशबंदी, १७ प्रमुख रस्ते बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

बंगळुरूतील CEO ची मोठी घोषणा; "४ राज्यांतील पुरुषांना नोकरी देणार नाही", सोशल मीडियावर चर्चेला उधाण