महाराष्ट्र

मध्य रेल्वेची डॉक्टर ऑन कॉल सेवा; २०१९ प्रवाशांना मिळाले तातडीने उपचार

प्रवासादरम्यान आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेने डॉक्टर्स ऑन कॉल सेवा कार्यक्रम सुरू केला आहे.

Swapnil S

मुंबई : प्रवासादरम्यान आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेने डॉक्टर्स ऑन कॉल सेवा कार्यक्रम सुरू केला आहे. त्यानुसार, मध्य रेल्वेच्या डॉक्टर-ऑन-कॉल टीमने १ जून ते ३१ जुलै या कालावधीत २०१९ प्रवाशांना वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये नागपूर विभागातील ८१५, भुसावळ विभागातील ५८७, पुणे विभागातील २९७, सोलापूर विभागातील २३६ आणि मुंबई विभागातील ८४ प्रवाशांचा समावेश आहे.

प्रवासादरम्यान वैद्यकीय मदतीची गरज असलेल्या किंवा आपत्कालीन परिस्थितीत रेल मदद ॲप मार्गे पुढच्या स्थानकावर किंवा ट्रेन कंडक्टर / प्रवासी तिकीट परीक्षक किंवा ट्रेन व्यवस्थापकाशी संपर्क साधून डॉक्टरांच्या सेवांचा लाभ प्रवाशांना घेता येतो. प्रवाशांनी वैद्यकीय मदत मागताच रेल मदद ॲप कडून किंवा ट्रेन कंडक्टर/टीटीई/ट्रेन मॅनेजर मार्फत पुढील येणाऱ्या स्टेशनच्या ऑनड्युटी स्टेशन व्यवस्थापकाला संदेश पाठवला जातो. त्याठिकाणी डॉक्टर आणि पॅरामेडिक्सची वैद्यकीय टीम उपस्थित राहते. प्रवाशाला मोठी समस्या असल्यास त्याला जवळच्या रुग्णालयात वैद्यकीय उपचार करण्यात येतात.

नुकत्याच घडलेल्या एका घटनेत कोचुवेली-लोकमान्य टिळक टर्मिनस अतिजलद एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या छातीत दुखू लागले. त्यांच्या नातेवाईकांनी रेल मददच्या माध्यमातून मदत मागितली होती.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

सावत्र भावांना बहिणींनी जोडा दाखवला - मुख्यमंत्री

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

तुष्टीकरणाला उत्तर कसे द्यायचे हे महाराष्ट्राने दाखवले - मोदी