महाराष्ट्र

चाळीसगाव : माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराने निधन

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे मंगळवारी (दि. २१) पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने जळगाव आणि उत्तर महाराष्ट्रातील राजकारणात शोककळा पसरली असून, कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेहा जाधव - तांबे

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे मंगळवारी (दि. २१) पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने जळगाव आणि उत्तर महाराष्ट्रातील राजकारणात शोककळा पसरली असून, कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

जनतेशी नातं जोडलेला नेते

राजीव देशमुख यांनी २००९ ते २०१४ या काळात चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. आमदार म्हणून त्यांनी मतदारसंघातील पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, शिक्षण आणि रस्ते विकास यासाठी सक्रिय प्रयत्न केले. त्याआधी ते चाळीसगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष होते. त्या काळात शहरातील नागरी विकास, स्वच्छता आणि रस्त्यांच्या सुधारणा प्रकल्पांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला होता.

राजीव देशमुख हे अभ्यासू आणि संतुलित राजकारणी म्हणून ओळखले जात. त्यांनी पक्षातील आणि विरोधकांतील नेत्यांशी सौहार्दाचे संबंध जपले होते.

पराभव असूनही प्रभाव कायम

२०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव पत्करावा लागला असला तरी, देशमुख यांनी राजकारणापासून कधीच अलिप्तता ठेवली नाही. पक्ष संघटनेच्या कामात ते सक्रिय राहिले आणि शरद पवार गटामध्ये प्रदेश उपाध्यक्ष म्हणून महत्त्वाची भूमिका निभावली.

अलीकडील काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, चाळीसगाव नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी त्यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. त्यांचा अनुभव, प्रशासकीय जाण आणि जनसंपर्क लक्षात घेता, त्यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती.

कल्याण-डोंबिवलीकरांना दिलासा; काळू धरण प्रकल्प लवकर पूर्ण होणार, एकनाथ शिंदेंचे आश्वासन

कारवाई तर होणारच! इंडिगोच्या कारभारावर मुरलीधर मोहोळ यांचा थेट इशारा

भाजप खासदाराच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळे थिरकल्या; कंगना रणौतचाही व्हिडीओ व्हायरल

स्मृती मानधना-पलाश मुच्छलचं लग्न मोडलं; दोघांचीही सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

Goa Nightclub Fire Update : आगीत २५ जणांचा दुर्दैवी अंत तर ६ जण जखमी, पंतप्रधान राष्ट्रीय निधीतून मदत जाहीर