'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

इमारतींना ओसी देण्यापूर्वी PNG जोडणी अनिवार्य करा - छगन भुजबळ

इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) देण्यापूर्वी पाणी आणि विजेप्रमाणेच पीएनजी जोडणी अनिवार्य करावी, अशी सूचना भुजबळ यांनी केंद्र सरकारला केली आहे.

Swapnil S

मुंबई/नवी दिल्ली : येत्या तीन महिन्यांनंतर एलपीजी पुरवठ्यात अडथळे येऊ शकतात, अशा सूचना केंद्राकडून मिळाल्या आहेत त्यामुळे आगामी काळात घरगुती गॅस (एलपीजी पुरवठ्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती लक्षात घेता, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी 'पाईप्ड नॅचरल गॅस' (पीएनजी) जोडणीचा विस्तार वेगाने करण्याचे निर्देश दिले आहेत. इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) देण्यापूर्वी पाणी आणि विजेप्रमाणेच पीएनजी जोडणी अनिवार्य करावी, अशी सूचना भुजबळ यांनी केंद्र सरकारला केली आहे. दिल्ली येथे केंद्रीय मंत्र्यांसोबत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

भुजबळ यांनी स्पष्ट केले की, पीएनजी पाईपलाइन टाकण्यासाठी लागणाऱ्या मंजुरीची प्रक्रिया आता अत्यंत वेगवान केली जाईल. विविध विभागांकडून मिळणाऱ्या परवानग्या आता २४ तासांच्या आत 'डीम्ड' (मान्यता मिळालेली) समजल्या जातील ज्यामुळे कामात कोणताही विलंब होणार नाही.

ठाण्यात खळबळ! ठाकरेंच्या नेत्याची निर्घृण हत्या; दोन संशयित ताब्यात, कुटुंबीयांकडून गंभीर आरोप

LPG Cylinder New Rules : १ ऑक्टोबरपासून बदलणार सिलिंडरचे 'हे' ५ नियम; बुकिंग करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

Mumbai : १ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर...CSMT वर ७५ दिवसांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक

"शिकवायला येतात की Instagram ID मागायला?" वर्गात मोबाईलवर गेम खेळणाऱ्या शिक्षकावर विद्यार्थिनीचे गंभीर आरोप, VIDEO

कल्याण : RTO च्या तीन एकर जागेवर अतिक्रमण; रस्त्यावर ड्रायव्हिंग टेस्ट घेण्याची वेळ, तात्पुरती व्यवस्था करण्याचे आवाहन