(फोटो सौ. ANI) 
महाराष्ट्र

छगन भुजबळांचे महायुती सरकारमध्ये पुनरागमन; मंत्रीपदाची घेतली शपथ, नाराज नेत्यांबद्दल म्हणाले..

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज मंत्रीमंडळात पुन्हा एकदा प्रवेश केला. मुंबईतील राजभवनात सकाळी पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही या प्रसंगी उपस्थित होते.

नेहा जाधव - तांबे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज मंत्रीमंडळात पुन्हा एकदा प्रवेश केला. मुंबईतील राजभवनात सकाळी पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही या प्रसंगी उपस्थित होते.

शपथविधीनंतर माध्यमांशी बोलताना भुजबळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “महाराष्ट्राला विकासाचा रोडमॅप देणारे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांचे सर्वसमावेशक कार्य आणि लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांची झुंजार वाटचाल यांचा आदर्श नेहमी माझ्यासमोर राहील. भारतीय संविधानाच्या मूल्यांवर चालत, सर्व समाजघटकांच्या कल्याणासाठी प्रामाणिक आणि निष्ठेने काम करण्याचा निश्चय मी पुन्हा एकदा व्यक्त करतो," असे त्यांनी सांगितले.

मंत्रीपद कोणते असावे याबद्दल विचारले असता भुजबळ म्हणाले, “मुख्यमंत्री जी जबाबदारी देतील ती मी आनंदाने स्वीकारेल.” दरम्यान, या शपथविधीनंतर काही नेत्यांकडून नाराजी व्यक्त झाल्याची चर्चा होती. यावर भुजबळांनी मिश्किल शैलीत प्रतिक्रिया देत, “त्यांचे मी आभार मानतो,” असे सांगितले.

गेल्या काही महिन्यांत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे राजकीय बदल झाले आहेत. छगन भुजबळ यांची ही पुनर्नियुक्ती धनंजय मुंडे यांच्या जागी करण्यात आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद रिक्त झाले होते. सध्या कोणते खाते भुजबळांकडे सोपवले जाईल, याची अधिकृत घोषणा लवकरच अपेक्षित आहे.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत