छगन भुजबळ  संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

मंत्रिपद न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज; नागपुरातील पक्ष मेळाव्याला गैरहजर

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना वगळण्यात आल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे.

Swapnil S

नागपूर : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना वगळण्यात आल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे. नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष मेळाव्याला ते उपस्थित नसल्याने या चर्चांना उधाण आले आहे.

अजित पवारांकडून ऐनवेळी धनंजय मुंडे यांना संधी देण्यात आली. त्यामुळे भुजबळ यांचे नाव मागे पडल्याचे समजते. दरम्यान, नागपूर येथील देशपांडे हॉल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा पार पडला. सर्व आमदारांना या ठिकाणी बोलावण्यात आले होते. या कार्यक्रमाला अजित पवार, सुनील तटकरे यांच्यासह सर्वच आमदार उपस्थित होते. मात्र, छगन भुजबळ गैरहजर राहिल्याने ते नाराज असल्याच्या चर्चेला उधाण आले.

विधान परिषद निवडणुकांना उत्स्फूर्त प्रतिसाद; स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांत विक्रमी मतदान, बहुतांश ठिकाणी ९८ टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद

Mumbai : यकृत, मधुमेहावर प्रभावी उपचारांचा नवा मार्ग मोकळा; ‘आयआयटी बॉम्बे’च्या संशोधनातून यश

Mumbai : दहिसर-भाईंदर उन्नत मार्गावरून खडाजंगी; २ हजार कोटींच्या प्रकल्पाचा भार मुंबईकरांवर का?, स्थायी समितीत सदस्यांचा सवाल

Thane : दिवा स्थानकात गर्डर उभारणीसाठी विशेष ब्लॉक; काही लोकल सेवा रद्द, मेल-एक्स्प्रेस गाड्याही उशिराने धावणार

Mumbai : शिवसेनेच्या दोन्ही गटांचे आज मेळावे; ठाकरेंचे षण्मुखानंदमध्ये, तर शिंदेंचे गोरेगाव नेस्को संकुलात शक्तिप्रदर्शन