संग्रहित छायाचित्र 
महाराष्ट्र

छगन भुजबळांच्या संभाव्य सेना प्रवेशाला गावकऱ्यांचाच विरोध; ‘भुजबळ हटाव-येवला बचाव’च्या घोषणा

राज्यातील मराठा आरक्षण चिघळविण्याचा आणि दोन समाजामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी अशी तेढ निर्माण करण्याचे काम भुजबळ यांनी केले असल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे लासलगाव येवला मतदार संघातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.

Swapnil S

लासलगाव : लोकसभा व राज्यसभा निवडणुकीनंतर महायुतीवर राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले असतानाच, भुजबळांना शिवसेनेत प्रवेश देऊ नये असा ठराव त्यांच्याच मतदारसंघातील लासलगावसह ४६ गावांतील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला. हा ठराव पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला जाणार असल्याची माहिती माजी आमदार कल्याणराव पाटील दिली. ‘भुजबळ हटाव - येवला बचाव’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

राज्यातील मराठा आरक्षण चिघळविण्याचा आणि दोन समाजामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी अशी तेढ निर्माण करण्याचे काम भुजबळ यांनी केले असल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे लासलगाव येवला मतदार संघातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. येथील शिवसेना संपर्क कार्यालयात आज झालेल्या बैठकीत भुजबळ यांना पक्षात घेतल्यास फायदा तर दूरच नुकसान होईल. यामुळे त्यांना पक्षात प्रवेश देऊ नये. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर भुजबळांनी बाळासाहेब ठाकरे यांना जो त्रास दिला आहे ते आजही कट्टर शिवसैनिक विसरलेले नाहीत. त्यामुळे पक्षात घेऊ नये ही भूमिका माझ्यासह शिवसैनिकांची असल्याचे आमदार कल्याणराव पाटील यांनी सांगितले.

यावेळी विकास रायते, महिला आघाडीच्या मनीषा वाघ, प्रमोद पाटील, विंचूर येथील शिवसेनेचे दिलीप चव्हाण, प्रमोद पाटील, खडक मालेगाव येथील विश्वनाथ चव्हाण, हर्षल काळे यांनी मनोगत व्यक्त करताना भुजबळ यांना प्रवेश देण्यास कडाडून विरोध केला. भुजबळ यांना शिवसेनेच्या उभाठा गटात प्रवेश दिला आणि उमेदवारी दिली तर मतदार पक्षापासून दूर जातील असे वातावरण आहे असा संदेश देणारा हा मेळावा प्रथमच लासलगाव येथे येवला मतदार संघात झाला.

INS Udaygiri: ‘उदयगिरी’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात; स्वीकृती दस्तावेजावर स्वाक्षरी, बघा काय आहे खासियत?

पंढरपूर वारीत अर्बन नक्षलवादी? विधानसभेत आमदार मनीषा कायंदे काय म्हणाल्या? बघा Video

कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्र सरकारची मंजुरी; प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पालिका करणार हायकोर्टात अर्ज

पुण्यातील नद्यांच्या पूररेषा नव्याने आखाव्यात; ४ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

Dombivli : ''घरी कोणीही नाही, फाशी घे''...तरुणीचा WhatsApp मेसेज अन् तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; गुन्हा दाखल