Photo : X (Devendra Fadanvis)
महाराष्ट्र

राज्यातील ४०० शहरांचा चेहरामोहरा बदलणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

तुम्ही भाजपाला मत द्या नंतर पाच वर्ष शासन तुम्हाला साथ देईल, असे सांगत कुणावरही टीका न करता आम्हाला सकारात्मक मत हवे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भुसावळ येथे केले.

Swapnil S

जळगाव : शहरांच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याने शहरे ही भकास झाली. आता शहराच्या विकासाची व्यवस्था ही झालीच पाहिजे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक योजना सुरू केल्या. महाराष्ट्रासाठी शहर विकासाचे आम्ही ब्लू प्रिंट तयार केले आहे. कारण शहरे ही बदलली पाहिजेत. यासाठी तुम्ही भाजपाला मत द्या नंतर पाच वर्ष शासन तुम्हाला साथ देईल, असे सांगत कुणावरही टीका न करता आम्हाला सकारात्मक मत हवे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भुसावळ येथे केले.

भाजपाच्या वतीने आयोजित जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. जळगाव जिल्ह्यातील नगराध्यक्ष व नगरसेवक प्रचारार्थ या सभेचे आयोजन केले होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यातील ६.५ कोटी जनता ही ४०० शहरात राहाते. या शहरांचा चेहरा बदलला तर तेथील लोकांचे राहणीमान बदलू शकते. शहर विकासासाठी जागतिक बँकेकडून पैसे मिळणार आहेत. त्यातून पिण्याचे पाणी आणि सांडपाण्याची योजना राबवली जाईल, असे सांगितले.

भुसावळला टेक्सटाईल पार्क आणि दीपनगरला ८०० मेगावॉटचा प्रकल्प देण्याची मंत्री संजय सावकारे यांची मागणी त्यांनी मान्य केली. संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे या भुसावळमधून नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत आहेत. त्यावर टीका झाली असता मुख्यमंत्री म्हणाले की, पक्षाने सर्व्हे केला असता रजनी सावकारे यांच्या महिलांमधील कार्यामुळे त्या सर्व्हेत प्रथम क्रमांकावर आहेत. त्यामुळे पक्षाने त्यांना तिकीट दिले. संजूभाऊ तुम्ही टीकेकडे लक्ष देऊ नका. यावेळी बिनविरोध निवडून आलेल्यां उमेदवारांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अभिनंदन करत जिल्हयात आम्ही महिलाराज आणत असल्याचे सांगितले.

रोहित पवार काकांच्या खांद्यावर बसून निवडून आले – महाजन

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, साधना गिरीश महाजन या जामनेरमध्ये बिनविरोध नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्याचे रोहित पवारांना वाईट वाटले. आम्ही सात वेळा चांगले कामे करीत असल्याने निवडून येत आहोत. राज्यात सर्वात चांगले आरोग्याचे काम आम्ही करत आहोत. त्यामुळे कामाच्या भरवशावर साधना महाजन निवडून आल्या रोहित पवार हे काकांच्या खांद्यावर बसून, पोस्टल बॅलेट पेपरवर निवडून आले आहेत. काकांचा आशीर्वाद आणि भरवसा यावर ते निवडून आल्याने रोहित पवार तुम्हाला बोलण्याचा, राजीनामा मागण्याचा अधिकार नसल्याचे महाजन यांनी सुनावले.

Mumbai : १४ फूट उंच झोपड्यांच्या कारवाईवरून विरोधक आक्रमक; काँग्रेस, ठाकरेंच्या शिष्टमंडळांनी घेतली आयुक्तांची भेट

Kolhapur : भरधाव Ertiga ची दुचाकीला जबर धडक; पती-पत्नी थेट हवेत; एकजण जागीच ठार, अंगावर काटा आणणारा Video व्हायरल

समुद्रातील तरंगता कचरा हटवण्यासाठी रोबोटिक बोटी; ३.६ कोटींच्या प्रकल्पाला BMC ची मंजुरी, गेट वे, बधवार पार्क येथील प्रयोग यशस्वी

मुंबई मेट्रो वनची व्यवस्थापन क्षेत्रात भरारी; एकात्मिक आयएमएस-आयएसएमएस प्रमाणपत्र मिळवणारी देशातील पहिली मेट्रो

Mira-Bhayandar : कृत्रिम तलावांतील मूर्तींवर जेसीबीने भराव; पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल