महाराष्ट्र

पृथ्वीराज चव्हाणांनी माण-खटाव मतदारसंघातून उमेदवार केला जाहीर? 'या' नेत्याला तिकीट? कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याच्या सूचना

आमदार जयकुमार गोरे यांचे नाव न घेता माण खटावच्या नेतृत्व वाढीबाबत मीच पाठबळ दिल्याने ती माझी चूक झाल्याची कबुलीही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

Swapnil S

कराड : माण-खटाव मतदारसंघ हा मूळचा काँग्रेसचाच आहे. मागील एक दोन वेळचा अपवाद वगळता येथील जनतेने नेहमीच काँग्रेसला साथ दिली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे रणजित देशमुखच ही निवडणूक जिंकणार असल्याने सर्वांनी तयारीला लागण्याच्या सूचना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.

माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या बीएलई व प्रमुख पदाधिकाऱ्यांचा संवाद मेळावा बुधवारी दुपारी पिंगळी येथील वैभव मंगल कार्यालयात संपन्न झाला. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राज्य कार्यकारणी सदस्य रणजितसिंह देशमुख, माजी आमदार रामहरी रुपनवर, राजेंद्र शेलार, काँग्रेसचे माण तालुकाध्यक्ष अध्यक्ष बाबासाहेब माने, खटाव तालुकाध्यक्ष डॉ. संतोष गोडसे उपस्थित होते.

पुढे चव्हाण म्हणाले की, काँग्रेसचा विचारच देशाला तारेल. लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती ही येणाऱ्या विधानसभेत होणार आहे, असा विश्वास व्यक्त करत सर्व महापुरुषांचे पुतळे ऊन, वारे, पाऊस खात उभे आहेत. मात्र महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यामुळे पडल्याचे कारण सांगणे लाजिरवाणे असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

माजी आमदार रामहरी रूपनवर म्हणाले की, राजकारण आणि विचारसरणी बदलत चालली आहे. आपण असलेल्या पक्षातील आपली भूमिका ओळखायला पाहिजे. मतभेद निर्माण झाले तरी मनभेद तयार होऊ देऊ नका, असा सल्ला त्यांनी दिला. तसेच माण-खटाव हा मतदारसंघ हा काँग्रेसचाच असल्याची ठाम भूमिकाही मांडली.

रणजितसिंह देशमुख म्हणाले की, हा मतदारसंघ पूर्वीपासून काँग्रेसच्या विचारांचा आहे. माण आणि खटावला पाणी देण्याची भूमिका ही आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची असल्याने ते खरे जलनायक आहेत. सध्या या मतदारसंघात वाहत असलेल्या पाण्याचे श्रेय हे पृथ्वीराज चव्हाण यांचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

माण-खटावच्या नेतृत्वाबाबत चूक...

आमदार जयकुमार गोरे यांचे नाव न घेता माण खटावच्या नेतृत्व वाढीबाबत मीच पाठबळ दिल्याने ती माझी चूक झाल्याची कबुलीही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी