मंत्री नितीन गडकरींच्या नागपुरातील घराबाहेर काँग्रेसचे आंदोलन; कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात (Photo-X)
महाराष्ट्र

मंत्री नितीन गडकरींच्या नागपुरातील घराबाहेर काँग्रेसचे आंदोलन; कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

इथेनॉलमिश्रित 'ई२० इंधन' धोरणाविरोधात सोमवारी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नागपुरात तीव्र निदर्शने केली.

Swapnil S

नागपूर : इथेनॉलमिश्रित 'ई२० इंधन' धोरणाविरोधात सोमवारी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नागपुरात तीव्र निदर्शने केली. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील निवासस्थानाला 'घेराव' घालण्यासाठी निघालेल्या या मोर्चाला पोलिसांनी वाटेतच रोखले. या दरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली असून अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

युवक काँग्रेसतर्फे महल परिसरातील गडकरी यांच्या निवासस्थानापर्यंत मोर्चा काढण्यात आला. ई-२० इंधनामुळे वाहनधारकांचे नुकसान व अवाजवी दर याविरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

काँग्रेस आक्रमक

गडकरी यांनी संसदेत ई२० इंधनाच्या देशभरातील अंमलबजावणीबाबत दिलेल्या उत्तरावर काँग्रेसने थेट निशाणा साधला आहे. काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी एक्सवर पोस्ट करत गडकरींवर टीका केली. वाहनांचे नुकसान होत नाही, असा दावा गडकरी करत आहेत.

मात्र, गेल्या काही महिन्यांपासून ग्राहक व मेकॅनिक वेगळाच अनुभव सांगत आहेत, असे रमेश म्हणाले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक चार रात्री बंद; ऐरोली-काटई नाका पुलावर गर्डर टाकण्याचे काम, वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग जाहीर

Mumbai : जोगेश्वरी उड्डाणपुलाची होणार दुरुस्ती; महापालिका २७ कोटी २४ लाख खर्च करणार, सहा महिन्यांत काम पूर्ण करण्याचे नियोजन

Tirupati Blast : फार्मा कंपनीत मोठी दुर्घटना! बॉयलरच्या स्फोटात ५ जणांचा मृत्यू, १० जण गंभीर जखमी; बचावकार्य सुरू, VIDEO

CNG Car Blast : गॅस भरतानाच कारचा भीषण स्फोट; थरकाप उडवणारा VIDEO, वाहनचालकांनो 'या' चुका टाळा, नाहीतर...

Mumbai : 'ठाकरें'च्या मोर्च्याचा मार्ग बदलला; मेट्रो सिनेमा ते पालिका मुख्यालय असा निघेल मोर्चा, पोलिसांच्या विनंतीनुसार घेतला निर्णय