महाराष्ट्र

गरीबांच्या ‘फ्रीज’ची मागणी वाढली; यंदा माठांच्या किमती १०० ते ३०० रुपयांपर्यंत पोहोचल्या

दरवर्षीप्रमाणे गरीबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठाचे बाजारात आगमन झाले. मात्र यंदा माठांच्या किमती १०० ते ३०० रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत.

Swapnil S

हारून शेख/ लासलगाव

गेल्या काही दिवसांपासून लासलगाव व परिसरात उन्हाचा चटका जाणवू लागल्याने गरीबाचा ‘फ्रीज’ म्हणून ओळखल्या जाणाऱे मातीचे माठ येथील रविवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.

शहरातील मेनरोड आठवडे बाजार, बाजार तळ या ठिकाणी माठ विक्रीची मोठ्या प्रमाणात दुकाने थाटल्याचे दिसून आले. उन्हाच्या झळा वाढू लागल्यामुळे नागरिकांना थंड पाण्याची आवश्यकता भासू लागली आहे. दरवर्षीप्रमाणे गरीबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठाचे बाजारात आगमन झाले. मात्र माठासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत काही प्रमाणात वाढ झाल्याने यंदा माठाचे दरात १० टक्क्यांची वाढ झाल्याचे वेळापूर येथील कुंभार रामदास भागवत यांनी सांगितले.

होळीनंतर माठांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होते. कुंभार व्यावसायिक वर्षभर मेहनत घेऊन माठ बनवत असतात. उन्हाळ्याच्या प्रारंभी माठ बाजारात दाखल होतात. थंडगार पाण्यासाठी महागडा फ्रीज घेणे गरीबांना आवाक्याबाहेर असल्याने मातीचा माठातून तहान भागवितात. मातीच्या माठात अनेक गुणधर्म असतात, त्यामुळेही मोठ्या प्रमाणात मागणी असते. शहरातील काही भागात माठ विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली आहे. बदलत्या काळानुसार थंडगार पाण्याचे माठाची जागा विविध प्रकारच्या साधनांनी घेतली त्यामुळे काही प्रमाणात परिणाम झालेला आहे.

माठासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने गतवर्षाच्या तुलनेत यंदा माठांच्या किमती १०० ते ३०० रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. लहान-मोठ्या आकारातील लाल, काळ्या रंगाचे माठ, रांजण आणि नळ लावलेले माठ विक्रीसाठी तयार आहेत. उन्हाचा कडाका वाढल्याने माठांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असून, नागरिकांकडून चांगली मागणी आहे. - रामदास भागवत, कुंभार,वेळापूर

'ऑक्टोबर हिट'चा तडाखा! मुंबई, रायगडमध्ये आज उष्णतेची पहिली लाट; ‘यलो अलर्ट’ जारी, कोकणासह ठाणे-पालघरही तापणार

Mumbai : ॲॅक्वा मेट्रोतून ७.२ कोटी जणांचा प्रवास; वर्षभरात प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

Thane : आयोग बदला, निवडणूक वाचवा! ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा; सुप्रिया सुळे यांची मागणी

कर अधिकाऱ्यांचे अटकेचे अधिकार अखेर रद्द; जीएसटी परिषदेची करदात्यांसाठी जलद परताव्यालाही मंजुरी

वाढत्या उष्म्याने ठाणे तापले; पाखरांची तहान वाढली, ३६-३७ अंशांचा पारा, मध्यरात्रीही ३०-३१ अंशांची धग