AAPचा मोठा निर्णय! खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेतील उपनेतेपदावरून हटवले; भाषणावरही बंदी, नेमकं कारण काय?

चढ्ढा हे आतापर्यंत संसदेत विविध मुद्दे आक्रमकपणे मांडत होते, मात्र आता त्यांना बाजूला करण्यात आल्याचे दिसत आहे.
AAPचा मोठा निर्णय! खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेतील उपनेतेपदावरून हटवले; भाषणावरही बंदी, नेमकं कारण काय?
AAPचा मोठा निर्णय! खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेतील उपनेतेपदावरून हटवले; भाषणावरही बंदी, नेमकं कारण काय?
Published on

आम आदमी पक्षात (AAP) मोठा राजकीय निर्णय घेत खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेतील उपनेतेपदावरून हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी अशोक मित्तल यांची नियुक्ती करण्याची शिफारस पक्षाने राज्यसभा सचिवालयाला पाठवलेल्या पत्रातून केली आहे. याशिवाय, चढ्ढा यांना सभागृहात बोलण्यासाठी वेळ देऊ नये, अशीही सूचना या पत्रात करण्यात आली आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, AAP ने अधिकृतपणे राज्यसभा सचिवालयाशी संपर्क साधत हा बदल कळवला. पक्षातील या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. चढ्ढा हे आतापर्यंत संसदेत विविध मुद्दे आक्रमकपणे मांडत होते, मात्र आता त्यांना बाजूला करण्यात आल्याचे दिसत आहे.

AAPचा मोठा निर्णय! खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेतील उपनेतेपदावरून हटवले; भाषणावरही बंदी, नेमकं कारण काय?
मुंबई एअरपोर्टवर १० रुपयांत चहा; राघव चड्ढांचा उडान यात्री कॅफेतील अनुभव चर्चेत, पाहा Video

निर्णयामागील कारण काय?

राघव चढ्ढा यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा होत असताना हा निर्णय घेण्यात आला. अलीकडील काळात त्यांनी पक्षाच्या उपक्रमांपासून काहीसे अंतर ठेवले होते. तसेच, संसद आणि सोशल मीडियावर त्यांनी केंद्र सरकारच्या काही निर्णयांचे कौतुक केल्यानेही चर्चा रंगल्या.

पक्षातील अंतर्गत हालचाली

दिल्लीतील कथित मद्य घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांची निर्दोष सुटका झाल्यानंतर चढ्ढा यांनी कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया दिली नाही. यामुळे पक्षातील मतभेदांच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.

राज्यसभेतील AAP ची ताकद

सध्या आम आदमी पक्षाचे राज्यसभेत एकूण १० खासदार आहेत. त्यापैकी ७ पंजाबमधून तर ३ दिल्लीमधून निवडून आले आहेत.

राघव चढ्ढा यांचा राजकीय प्रवास

  • २०१२ मध्ये अरविंद केजरीवाल यांच्यासोबत लोकपाल विधेयकावर काम

  • पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि सर्वात तरुण खजिनदार

  • २०१९ लोकसभा निवडणूक (दक्षिण दिल्ली) - पराभव

  • २०२० मध्ये राजेंद्र नगरमधून विधानसभा विजय

  • दिल्ली जल बोर्डचे उपाध्यक्ष

  • २०२२ मध्ये वयाच्या ३३ व्या वर्षी सर्वात तरुण राज्यसभा खासदार

AAPचा मोठा निर्णय! खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेतील उपनेतेपदावरून हटवले; भाषणावरही बंदी, नेमकं कारण काय?
राज्यसभा खासदार राघव चड्ढा बनले Blinkit डिलिव्हरी पार्टनर; "मी त्यांचा दिवस जगलो...", Video व्हायरल

यानंतर चढ्ढा यांनी पक्षाच्या संघटनात्मक आणि संसदीय कामात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, या निर्णयामुळे त्यांच्या राजकीय भवितव्याबाबत नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in