महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस यांना जपानच्या कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवी प्रदान

Swapnil S

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज(26 डिसेंबर) जपानमधील कोयासन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठातील दीक्षांत सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.  कोयासन विद्यापीठाचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस हे ऑगस्टमध्ये जपान दौऱ्यावर गेले असता कोयासन विद्यापीठाने यासंबंधीची घोषणा केली होती.

 कोयासन विद्यापीठाने १२० वर्षांच्या इतिहासात प्रथमच मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्याचा निर्णय घेतला असून,  ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रदान करण्यात आली आहे. पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेले कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेले कार्य यासाठी ही मानद डॉक्टरेट त्यांना प्रदान करण्यात आली आहे.

कोयासन विद्यापीठाचे प्रो. इन्युई रुनिन, वाकायामा प्रांताचे आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाचे संचालक यामाशिता योशियो, जपानचे मुंबईतील कौन्सिल जनरल डॉ. फुकाहोरी यासुकाता हे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. 2015 मध्ये देवेंद्र फडणवीस हे जपान दौऱ्यावर गेले तेव्हा कोयासन विद्यापीठात त्यांनी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले होते. त्यानंतर 2018 आणि 2023 मध्ये त्यांनी जपानला भेट दिली होती.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त