महाराष्ट्र

संभाजी भिडेंवर अखेर देवेंद्र फडणवीस बोलले; म्हणाले, "महात्मा गांधीचा..."

भिडेंनी महात्मा गांधी यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेसचे लोक रस्त्यावर उतरताय पण...

नवशक्ती Web Desk

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे वडील करमचंद नसून एक मुस्लीम जमीनदार होते. असं विधान संभाजी उर्फ मनोहर भिडे यांनी केलं होते. त्यांच्या या विधानाचे पडसाद हे राज्यभर उमटले. विधीमंडळात देखील काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या विधानाचा निषेध करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. तसंच महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी भिडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

भिडेंच्या या विधानानंतर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर त्यांच्या विरोधात आंदोलन केल. आता यावर भाजप नेते आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भिंडेच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. तसंच कुठल्याही परिस्थितीत महात्मा गांधी यांचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशारा दिला आहे. यावेळी राज्य सरकार भिडे यांच्यावर योग्य कारवाई करेल, असं देखील त्यांनी सांगितलं.

भिडेंनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, "संभाजी भिडे यांनी जे वक्तव् केलं. त्याचा मी पूर्णपणे निषेध करतो.महात्मा गांधी देशाचे राष्ट्रपिता आहेत. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांच्याकडे एक नायक म्हणून पाहीलं जातं. अशा महानायकाबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं पु्र्णपणे अनुचित आहे.अशा प्रकारचं वक्तव्य कुणी करु नये, असं माझ स्पष्ट मत आहे.यामुळे करोडो लोकांच्या मनात निश्चितपणे संताप निर्माण होतो. महात्मा गांधींबद्दल बोललेलं लोक कधीही सहन करणार नाहीत. राज्य सरकारकडून या संदर्भात उचित कारवाई केली जाईल" असं फडणवीस म्हणाले आहेत.

यावेळी बोलताना त्यांनी संभाजी भिडेंचा भाजपाशी काही संबंध नाही. ते स्वत:ची संघटना चालवतात. याला जाणीवपूर्वक राजकीय रंग देण्याचं काहीही कारण नाही, असं सांगितलं. भिडेंनी महात्मा गांधी यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेसचे लोक रस्त्यावर उतरताय. पण राहुल गांधी जेव्हा स्वातंत्रवीर सावरकरांवर गलिच्छ बोलतात त्याचाही निषेध केला पाहिजे. पण ते त्यावेळी मिंधे होतात. असं देखील फडणवीस म्हणाले.

Thane : सर्व्हिस सेंटरमध्ये १० जूनपर्यंत वाहने धुण्यावर निर्बंध; पाणीटंचाई टाळण्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर ३ तासांचा ब्लॉक; पुढील दोन दिवस 'या' मार्गाने प्रवास करा, वाचा सविस्तर

विश्रांती कक्षाचा वापर धार्मिक विधींसाठी पुण्यातील बहुराष्ट्रीय कंपनीची चौकशी करण्याचे निर्देश

कल्याण शहरात अनधिकृत बॅनरवर बंदी; नियमभंग झाल्यास KDMCकडून कारवाईचा इशारा, भरावा लागेल 'इतका' दंड

अयान अहमद आईचे दागिने विकून करायचा शौक; अमरावती लैंगिक शोषणप्रकरणी धक्कादायक खुलासा