संग्रहित फोटो  
महाराष्ट्र

तिकीट वाटपाचे अधिकार फडणवीसांकडेच; भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय

इच्छुक व विद्यमान आमदारांनी भाजपच्या वरिष्ठ पातळीवर उमेदवारीसाठी सेटिंग लावली असतानाच तिकीट वाटपाची जबाबदारी भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच पुन्हा सोपवण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळावी म्हणून भाजपमधील इच्छुक उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहेत. इच्छुक व विद्यमान आमदारांनी भाजपच्या वरिष्ठ पातळीवर उमेदवारीसाठी सेटिंग लावली असतानाच तिकीट वाटपाची जबाबदारी भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच पुन्हा सोपवण्यात आली आहे. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने दिली.

लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश न मिळाल्याने विधानसभा निवडणुकीत भाजपने आतापासूनच रणनीती आखली आहे. कुठल्या मतदारसंघात भाजपचे पारडे भारी, कोणत्या मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेची ताकद जास्त आहे, तसेच ठाकरे, शरद पवार, काँग्रेसला कुठल्या मतदारसंघात जनतेची पसंती आहे, याचा सर्व्हे भाजपकडून करण्यात येत आहे. भाजपच्या सर्व्हेत विद्यमान आमदार मतदारसंघात अयशस्वी असल्यास तिकीट नाकारण्यात येणार असल्याचे भाजपच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले.

भाजपच्या कोअर कमिटीची बैठक रविवारी पार पडली. यावेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात त्यांना संपूर्ण अधिकार देऊन पुढील वाटचाल सुरू करण्याची भूमिका भाजपने स्पष्ट केली आहे.

विधानसभेसाठी जय्यत तयारी

महायुतीमधील सर्व पक्षांच्या जागा निश्चित करण्याचा निर्णय झाला आहे. आमच्या सर्व मित्रपक्षांसोबत बैठका होतच आहेत. विधानसभा जिंकण्याचे नियोजन आणि त्याचसोबत जागावाटप हा कार्यक्रमसुद्धा ठरला आहे. ही संपूर्ण प्रक्रिया देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू करण्याचे पक्षाने ठरवले आहे, अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली.

भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे महाराष्ट्र विधानसभा प्रभारी भूपेंद्र यादव, सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, सरचिटणीस विनोद तावडे, पंकजा मुंडे आदी उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीसंदर्भातील तयारी, आढावा आणि नियोजन या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे.

मुख्यमंत्रीपदाचा फैसला आज; महायुतीचे नेते व केंद्रीय संसदीय मंडळ घेणार निर्णय

महायुतीत मंत्रिपदासाठी २१-१२-१० चा फॉर्म्युला

आजपासून सुरू होणारे संसदेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार; अदानी, मणिपूरवर चर्चा करा! सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांची मागणी

यशस्वी, विराटचा शतकी तडाखा; भारताचा दुसरा डाव ४८७ धावांवर घोषित; ऑस्ट्रेलियाची ३ बाद १२ अशी अवस्था

यूपीतील हिंसाचारात तिघांचा मृत्यू; २० पोलिसांसह अनेक जण जखमी