धनंजय मुंडे यांना दणका! करुणा मुंडे यांच्या बाजूने माझगाव कोर्टाचा निकाल संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

धनंजय मुंडेंना हायकोर्टाचा झटका; पोटगीतील ५० टक्के रक्कम जमा करण्याचे आदेश

राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांना उच्च न्यायालयाने चांगलाच झटका दिला. विभक्त पत्नी करुणा शर्मा यांना कुटुंब न्यायालयाने मंजूर केलेल्या पोटगीची पन्नास टक्के रक्कम महिन्याभरात न्यायालयात जमा करा असा आदेशच गुरूवारी न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या एकलपीठाने दिला. सत्र न्यायालयाने या पोटगीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

Swapnil S

मुंबई : राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांना उच्च न्यायालयाने चांगलाच झटका दिला. विभक्त पत्नी करुणा शर्मा यांना कुटुंब न्यायालयाने मंजूर केलेल्या पोटगीची पन्नास टक्के रक्कम महिन्याभरात न्यायालयात जमा करा असा आदेशच गुरूवारी न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या एकलपीठाने दिला. सत्र न्यायालयाने या पोटगीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. दरम्यान हा आदेश धनंजय मुंडेना धक्का असल्याचे बोलले जाते.

मुंडेंच्या याचिकेवर आठ आठवड्यांनंतर अंतिम निर्णय

कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना दरमहा २ लाख रुपये पोटगी द्यावी, असे अंतरिम आदेश वांद्रे कुटुंब न्यायालयाने दिले होते. त्या आदेशावर सत्र न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर मुंडे यांनी उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर गुरूवारी न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या एकलपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने कुटुंब न्यायालयाने दिलेल्या पोटगीच्या आदेशानुसार आतापर्यंतच्या पोटगीतील पन्नास टक्के रक्कम सुमारे २१ लाख ८७ हजार रूपये वांद्रे कोर्टात पुढील चार आठवड्यांत जमा करण्याचे निर्देश देताना मुंडे यांच्या याचिकेवर आठ आठवड्यांनंतर अंतिम निर्णय दिला जाईल असे स्पष्ट केले.

"आता कोण गप्प आहे?" रुपयाच्या ऐतिहासिक घसरणीनंतर विरोधकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

मुंबईतील हॉटेल्स, बार, बेकऱ्या FDA च्या रडारवर; ख्रिसमस-नववर्षाच्या तोंडावर तपासणी मोहीम

मुंबईच्या हवा गुणवत्तेसाठी 'मानस'ची निर्मिती; IIT Kanpur च्या सहकार्याने BMC राबवणार प्रकल्प

Mumbai : 'कूपर'मध्ये बेडवरून रुग्ण पडण्याच्या घटनांत वाढ; नातेवाईकांकडून सुरक्षेची मागणी

Thane RTO : वाहनधारकांनो तुम्ही HSRP नंबर प्लेट बसवली? 'डेडलाईन' जारी; त्वरित ऑनलाइन अर्जाद्वारे अपॉइंटमेंट घेण्याचे आवाहन