महाराष्ट्र

"तुम्ही मला त्या वादग्रस्त विषयात ओढूच नका", मराठा-ओबीसी वादावर दिलीप वळसे-पाटील यांचा सावध पवित्रा

दिलीप वळसे-पाटील हे दोन दिवसीय बुलढाणा दौऱ्यावर आहेत.

नवशक्ती Web Desk

राज्यात सध्या ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद होताना दिसत आहे. तसंच छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे-पाटील यांच्यात देखील शाब्दिक चकमकी घडत आहेत. यावर बुलढाण्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मी सध्या बुलढाणा जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने विकास योजनांचा आढावा घेत आहे. यामुळे राज्यात काही सुरु आहे. याची मला फारशी कल्पना नाही. यामुळे मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील शाब्दिक संघर्षावर मी काहीच बोलणार नाही. तुम्ही मला वादग्रस्त विषयांमध्ये ओढूच नका, अशी प्रतिक्रिया राज्याचे सहकारमंत्री तथा बुलढाण्याचे पालकमंत्री दिलीप वळले पाटील यांनी दिली आहे.

दिलीप वळसे-पाटील हे दोन दिवसीय बुलढाणा दौऱ्यावर आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष, तसंच मंत्री छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे-पाटील यांच्यातील शाब्दिक संघर्ष या वादावर बोलण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मी दोन दिवसांपासून आढावा बैठकांत व्यस्त आहे. त्यामुळे या घडामोडींबद्दल अननिज्ञ आहे आणि तसंही तु्म्ही मला या वादग्रस्त विषयांमध्ये ओढूच नका, असं त्यांनी सांगितलं.

यावेळी बोलताना त्यांनी जिल्ह्यातील धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने आपली भेट घेऊन चर्चा केली. त्यांच्या भावना आपण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यातील ओअर समितीपर्यंत पोहचवणार आहे. बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेला ३०५ कोटींचे 'सॉफ्ट लोन' देण्यास राज्य बँकेने तत्वत: मान्यता दिली आहे. यासाठी आमदार राजेंद्र शिंगणे हे प्रयत्नशील असून मी देखील यात लक्ष घातलं आहे. सरकार व राज्य सहकारी बँकेच्या संपर्कात असल्याची माहिती दिलीप वसळे पाटील यांनी दिली.

याच बरोबर आढावा बैठकीत दुष्काळी स्थिती, पाणी टंचाई यावर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारीस, एसडीओ, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या. तसंच चारा वैरणाची टंचाई भासणार नाही याची दक्षता घेण्याचे व तसं नियोजन करण्याचं निर्देश त्यांना दिले.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी