महाराष्ट्र

डॉ. सुरेश गोसावी यांनी कुलगुरूपदाची सूत्रे स्वीकारली

महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी २६ डिसेंबर रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांची कुलगुरुपदी नियुक्ती केली

Swapnil S

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची सुत्रे डॉ. सुरेश वामनगीर गोसावी यांनी सोमवारी (दि.एक) कुलगुरुपदाची सुत्रे स्विकारली. मावळते कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी सकाळी ११ वाजता कुलगुरु कक्षात पदभार दिला.

महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी २६ डिसेंबर रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांची कुलगुरुपदी नियुक्ती केली. महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम कलम ११ अंतर्गत ही नियुक्त करण्यात आली. डॉ. गोसावी हे पासून सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी कार्यरत आहेत. तर डॉ. प्रमोद गोविंदराव येवले यांनी १६ जुलै २०१९ ते ३१ डिसेंबर २०२३ या काळात कुलगुरुपदाचा कार्यभार यशस्वीपणे सांभाळला. डॉ. गोसावी हे सोमवारी सकाळी पुण्याहून छत्रपती संभाजीनगरात दाखल झाले.

डॉ. येवले व डॉ.गोसावी यांनी पदभार समारंभापुर्वी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकती पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा, महात्मा फुले यांचा अर्धाकृती पुतळा तसेच यशवंतराव चव्हाण यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी कुलसचिव दिलीप भरड, विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ. कैलास अंभुरे, वित्त व लेखाधिकारी सविता जंपावाड, परीक्षा व मुल्यमापन मंडळ संचालक डॉ. भारती गवळी यांच्यासह अधिकारी, प्राध्यापक उपस्थित होते. यावेळी डॉ. येवले यांनी डॉ. गोसावी यांच्याकडे मानदंड सोपविला.

कुलगुरूपदाचा कार्यभार विनम्रपणे स्वीकारतो : डॉ.गोसावी

महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विद्यापीठाचा कुलगुरूपदाचा कार्यभार अत्यंत विनम्रपणे स्विकारतो, अशी भावना नवनियुक्त कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी पदभार घेतना बोलावून दाखविली.

मराठवाड्याचा ऋणी राहीन : डॉ. येवले

कुलगुरूपदाचा कार्यकाळात सर्व प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी विद्यार्थी, प्रसारमाध्यमांचे मोलाचे सहकार्य लाभले. या सर्वांचा मनापासून ऋणी राहीन, अशी भावना यावेळी मावळते कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी व्यक्त केली.

THANE : रामनवमीनिमित्त ट्रॅफिक निर्बंध; वागळे परिसरातील अनेक रस्ते बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Ram Navami 2026 : श्रीराम जन्मोत्सवानिमित्त मुंबईत २००० ड्रोनचा भव्य शो; काय असणार खास? जाणून घ्या वेळ आणि स्थळ

केंद्र सरकारचा निर्णय; घरात PNG असेल तर LPG पुरवठा बंद, गॅस कनेक्शनवर नवे नियम लागू

Mumbai : ८७० रुपयांच्या वादातून संतापजनक प्रकार; ओशिवरामध्ये सिगारेट विक्रेत्याला कारने फरफटत नेले, घटना CCTV मध्ये कैद

मुंबईकरांना दिलासा; मेट्रो 2Bमुळे चेंबूर परिसरातील प्रवास होणार जलद