महाराष्ट्र

पुणे शहरात ११०० कोटींचे ड्रग्ज जप्त

Swapnil S

पुणे: पुणे सांस्कृतिक शहर म्हणून जगभर ओळखले जाते. परंतु आता पुणे शहरात गुन्हेगारी वाढली आहे. ड्रग्जची तस्करी होत आहे. खुलेआम ड्रग्जची विक्री होत आहे. आता पुणे शहरात ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. पुणे शहरात आतापर्यंतचे सर्वात मोठे ड्रग्ज पकडले गेले आहे. पुणे शहरात ११०० कोटी रुपये किमतीचे ६०० किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात सोमवारी दोन गोडावूनची झडती घेऊन ५५ किलो ड्रग्ज जप्त केले होते. त्यानंतर मंगळवारी कुरकुंभमध्ये एका केमिकल कंपनीमध्ये ५५० किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. अजून या ड्रग्जचा साठा मिळण्याची शक्यता आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, साबळे नावाच्या व्यक्तीचा हा कारखाना आहे. या ठिकाणावरुन ड्रग्जचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आले आहे. या प्रकरणात देशभरात अनेक शहरात धाडी टाकण्यात येत आहेत. यामुळे अजून मोठ्या प्रमाणात ड्रग्जची जप्ती होऊ शकते.

पुण्यातील कुरकुंभ एमआयडीसीमध्ये ड्रग्ज रॅकेट उघड झाले आहे. कुरकुंभ येथील एका केमिकल कारखान्यात ड्रग्जची निर्मिती होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी खातरजमा करून कुरकुंभ एमआयडीसी मधील अर्थकेम लॅबोरेटरीज कंपनीवर छापा टाकला.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त