एकनाथ शिंदे  (Photo-X/@mieknathshinde)
महाराष्ट्र

शेतकऱ्याला नडाल, तर याद राखा - एकनाथ शिंदे

दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास देणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्या, फायनान्स कंपन्या, बँका आणि सावकारांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिला.

Swapnil S

दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास देणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्या, फायनान्स कंपन्या, बँका आणि सावकारांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिला. मायक्रो फायनान्स असो, फायनान्स कंपनी असो, बँक असो किंवा सावकारी कर्ज असो, शेतकऱ्याला नडणाऱ्याला बिल्कूल सोडणार नाही, असेही त्यांनी बजावले.

नांदेडमधील सक्तीच्या कर्जवसुलीच्या घटनेचा संदर्भ देत शिंदे यांनी अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारने ठाम भूमिका घेतल्याचे सांगितले. कर्जवसुलीसाठी शेतकऱ्याला कार्यालयात नेणे किंवा त्याच्यावर दबाव आणणे यासारखे प्रकार करणाऱ्यांवर कठोर गुन्हे दाखल केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोणी तगादा लावला तर घाबरू नका

आरबीआय, बँका आणि वित्तीय संस्थांशी चर्चा करून आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत. कर्जवसुलीसाठी कोणी तगादा लावला तर घाबरू नका. तात्काळ अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. सरकार तुमच्या पाठीशी आहे, असे आवाहन शिंदे यांनी शेतकऱ्यांना केले. दरम्यान, दुष्काळग्रस्त भागात पिण्याचे पाणी, टँकर, चारा आणि अन्य सुविधांचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. धरणांच्या परिसरातील गाळपेऱ्यात चारा लागवडीला प्रोत्साहन देतानाच त्यासाठी हमीभाव आणि आर्थिक लाभ देण्याचे नियोजन असल्याचेही शिंदे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुजोर फायनान्स कंपन्यांवर गुन्हे दाखल करा - देवेंद्र फडणवीस

राज्यात २३ जलविद्युत प्रकल्प प्रस्तावित; ३५ हजार मेगावाॅट क्षमतेचे प्रकल्प

Tiger Shroff Firing Case: सर्व आरोपींना मकोका लागू

कोण आहे हा लॉरेन्स बिष्णोई?

आजचे राशिभविष्य, २८ ऑक्टोबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत