प्रातिनिधिक फोटो ANI
महाराष्ट्र

नांदेडमध्ये धावणार इलेक्ट्रिक बस; बसस्थानकात ३१ चार्जिंग स्टेशन; प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न

Swapnil S

भास्कर जामकर/नांदेड

वातावरणातील प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने वाहन क्षेत्रातील सर्वाधिक मोठा सार्वजनिक उपक्रम असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बसेस याधीच दाखल झाल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातही लवकरच इलेक्ट्रिक बसची सुरुवात केली जाणार आहे. ५२ बसेस नांदेड जिल्हा आगारात दाखल होत असल्याचे आगार व्यवस्थापक अनिकत बल्लाळ यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यात इलेक्ट्रिक बस धावत आहेत. नांदेड जिल्ह्याच्या ताफ्यातही आता इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. इलेक्ट्रिक बस चालविण्यासाठी स्वतंत्र चार्जिंग स्टेशनची उभारणी करावी लागते. ३१ चार्जिंग स्टेशनच्या उभारणीसाठी प्राथमिक मंजुरी मिळाली असून, येत्या महिनाभरात त्याचे काम सुरू होणार आहे. या चार्जिंग स्टेशनवर एकाच वेळी ३१ बसेस जार्च करता येणार आहेत.

परिवहन महामंडळाच्या नांदेड आगाराचे मे महिन्यातील उत्पन्न साडेबारा लाख झाले असून, मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या उत्पन्नात ३५ हजारांनी जास्त वाढ झाली आहे. महामंडळाने प्रवाशांसाठी राबविलेल्या नवनवीन योजनांमुळे प्रवाशांनी महामंडळाच्या बसचा वापर केला असल्याचे दिसून येते.

परिवहन महामंडळाच्या इलेक्ट्रिक बसेस एका चार्जिंगमध्ये २०० ते ३०० किलोमीटरपर्यंत धावण्यास सक्षम आहेत. प्राथमिक स्तरावर नांदेड येथील बसस्थानकावर चार्जिंग स्टेशन उभारले जाणार असून, त्यानंतर तालुका स्तरावर चार्जिंग स्टेशनची उभारणी केली जाणार आहे.

प्रवाशांसाठी योजना

  • पहिली ते बारावीच्या विद्यार्थिनींसाठी मोफत प्रवास

  • विद्यार्थ्यांसाठी ३० टक्के सवलत

  • ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास

  • ७५ वर्षांखालील ज्येष्ठांना ५० टक्के सवलत

  • महिलांना ५० टक्के सवलत

नांदेड आगारात लवकरच ५२ इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. त्यासाठी लागणाऱ्या यंत्रणांचे नियोजन सध्या सुरू आहे. तसेच, यावर्षी उन्हाळ्यात नांदेड आगाराचे उत्पन्न ३५ हजारांनी वाढले असून प्रवाशांनी महामंडळाकडून राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ घ्यावा.

- अनिकेत बल्लाळ, आगार व्यवस्थापक नांदेड

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन