महाराष्ट्र

कोल्हापूर-मुंबई मार्गावर आता संध्याकाळीही विमानसेवा; २ मार्चपासून सुरूवात, बघा वेळापत्रक

सध्या केवळ सकाळच्या वेळेतच सुरू असलेली कोल्हापूर ते मुंबई ही विमानसेवा येत्या २ मार्चपासून सायंकाळच्या वेळेतही सुरू होणार आहे. सुरुवातीला, आठवड्यातील फक्त दोन दिवस सायंकाळची विमानसेवा असेल; पण लवकरच संपूर्ण आठवडाभर सायंकाळची विमानसेवा...

Krantee V. Kale

कोल्हापूर : सध्या केवळ सकाळच्या वेळेतच सुरू असलेली कोल्हापूर ते मुंबई ही विमानसेवा येत्या २ मार्चपासून सायंकाळच्या वेळेतही सुरू होणार आहे. सुरुवातीला, आठवड्यातील फक्त दोन दिवस (मंगळवार व गुरुवार) सायंकाळची विमानसेवा असेल; पण लवकरच संपूर्ण आठवडाभर सायंकाळची विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न असणार आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी याबाबत माहिती दिली.

कोल्हापूर-मुंबई विमानसेवेचे वेळापत्रक

सध्या कोल्हापुरातून मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, तिरुपती आणि अहमदाबाद या मार्गांवर प्रवासी विमानसेवा सुरू आहे. खासदार महाडिक यांच्या प्रयत्नातून २ मार्चपासून कोल्हापूर-मुंबई मार्गावर सकाळी आणि सायंकाळी अशा दोन्ही वेळा विमानसेवा उपलब्ध होणार आहे. सायंकाळी साडेचार वाजता, मुंबईहून स्टार एअरवेजचे विमान कोल्हापूरकडे उड्डाण करेल, आणि सायंकाळी पाच वाजून ३५ मिनिटांनी कोल्हापूरला पोहोचेल. सायंकाळी सहा वाजून ५ मिनिटांनी, कोल्हापूर विमानतळावरून पुन्हा मुंबईकडे विमान उड्डाण करेल, आणि सायंकाळी सात वाजून १० मिनिटांनी मुंबईत पोहोचेल. पहिल्या टप्प्यात दर मंगळवार व गुरुवार या सत्रातच स्टार एअरवेजची विमानसेवा प्रवाशांसाठी उपलब्ध असेल.

लवकरच संपूर्ण आठवडाभर सेवा

लवकरच, आठवड्याचे सातही दिवस सायंकाळच्या सत्रातील कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न असेल. तसेच सध्याच्या सायंकाळी साडेचार वाजेच्या उड्डाणाऐवजी संध्याकाळी सात-साडेसातनंतर मुंबईहून विमान उड्डाण करण्याची योजना आहे, असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. सकाळी व संध्याकाळी अशा दोन वेळा विमानसेवा सुरू झाल्यामुळे प्रवाशांची मोठी सोय झाली आहे.

तरुण तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; याचिका फेटाळली, दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

Mumbai : माझगावच्या गणपती मिरवणुकीवर अंडी फेकल्याचा आरोप; २२ वर्षीय तरुणाला अटक

Mumbai : बीकेसीतील 'एमसीए'च्या ५ उपाहारगृहांचे परवाने रद्द; FDA चा दणका; कारवाई सुरूच

Mumbai : चर्चगेट मेट्रो स्थानकातील लिफ्ट अचानक बंद; ६ प्रवासी अडकले

गर्लफ्रेंडने कारवर उमटवले ३४०० 'किस'; VIDEO व्हायरल होताच पोलिसांची कारवाई, तरुणाला ५,५०० रुपयांचा दंड