PM
महाराष्ट्र

कोयासन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट मिळविणारे फडणवीस पहिले

देवेंद्र फडणवीस हे ऑगस्टमध्ये जपान दौऱ्यावर गेले असता कोयासन विद्यापीठाने यासंबंधीची घोषणा केली होती.

Swapnil S

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंगळवारी जपानमधील कोयासन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट प्रदान केली जाणार आहे. मुंबई विद्यापीठातील दीक्षांत सभागृहात हा कार्यक्रम होणार असून, कोयासन विद्यापीठाचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित राहतील. देवेंद्र फडणवीस हे ऑगस्टमध्ये जपान दौऱ्यावर गेले असता कोयासन विद्यापीठाने यासंबंधीची घोषणा केली होती.

कोयासन विद्यापीठाने १२० वर्षांच्या इतिहासात प्रथमच मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्याचा निर्णय घेतला असून, ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रदान केली जाणार आहे. पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेले कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेले कार्य यासाठी ही मानद डॉक्टरेट त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. कोयासन विद्यापीठाचे प्रो. इन्युई रुनिन, वाकायामा प्रांताचे आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाचे संचालक यामाशिता योशियो, जपानचे मुंबईतील कौन्सिल जनरल डॉ. फुकाहोरी यासुकाता हे यावेळी प्रामुख्याने उपस्थित असतील. २०१५ मध्ये देवेंद्र फडणवीस हे जपान दौऱ्यावर गेले तेव्हा कोयासन विद्यापीठात त्यांनी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले होते. त्यानंतर २०१८ आणि २०२३ मध्ये त्यांनी जपानला भेट दिली होती.

आजचे राशिभविष्य, २१ डिसेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

‘मनरेगावर बुलडोझर’; नाव बदलावरून सोनिया गांधींची मोदी सरकारवर घणाघाती टीका

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा मोठा निर्णय; महाविकास आघाडीत फूट

"निवडणुक आयोगाने थेट बोली लावूनच..."; नगरपरिषद निवडणुकांवर रोहित पवारांची संतप्त प्रतिक्रिया

India T20 World Cup Squad : सूर्यकुमार यादव कर्णधार तर अक्षर पटेलकडे उपकर्णधारपदाची धुरा; गिलला संघातून डच्चू