महाराष्ट्र

पाच जिल्ह्यांतील छाप्यात १.४८ कोटींचा मुद्देमाल जप्त; FDA आणि पुणे ग्रामीण पोलिसांची संयुक्त कारवाई

पाण्यात शॅम्पू, डिटर्जंट आणि विविध रसायने मिसळून कृत्रिमरीत्या बनावट दूध तयार करून नामांकित ब्रँडच्या नावाने त्याची विक्री करणाऱ्या आंतरजिल्हा रॅकेटचा अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे.

Swapnil S

पुणे : पाण्यात शॅम्पू, डिटर्जंट आणि विविध रसायने मिसळून कृत्रिमरीत्या बनावट दूध तयार करून नामांकित ब्रँडच्या नावाने त्याची विक्री करणाऱ्या आंतरजिल्हा रॅकेटचा अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. रोज ६०० लिटर दूध संकलित करणाऱ्या एका केंद्राची क्षमता अचानक ४ हजार लिटरपर्यंत वाढल्याने पोलिसांना संशय आला. तपासातून या रॅकेटचे जाळे पुण्यासह सोलापूर, जालना, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, बीड आणि धाराशिव अशा सात ते आठ जिल्ह्यांत पसरल्याचे समोर आले आहे.

एफडीए आणि पोलिसांनी पाच जिल्ह्यांत एकाच वेळी छापे टाकून तब्बल १ कोटी ४८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सुशांत हिंगे याच्या ताब्यातून १,३८५ किलो भेसळयुक्त साठा जप्त करण्यात आला. त्याच्या घरातून डिटर्जंट लिक्विड, व्हे पावडर आणि इमल्सिफायरचे मोठे साठेही मिळून आले.या प्रकरणाचा पुढील तपास एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांचे विशेष पथक करीत आहे.

पोलिसांच्या तपासात आंबेगाव परिसरात मका ट्रेडिंगचा व्यवसाय करणारा सुशांत हिंगे हा या प्रकरणातील महत्त्वाचा आरोपी असल्याचे समोर आले आहे. तो मुख्य आरोपी संदीप लोढा याच्या संपर्कात आला होता. लोढाने बनावट दूध तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य पुरवठा करणाऱ्या व्यक्तीची माहिती दिल्यानंतर एप्रिल २०२४ मध्ये दोघांनी मिळून दूध भेसळीचे रॅकेट सुरू केल्याचा पोलिसांचा दावा आहे.

भेसळखोरांवर मकोका अंतर्गत कारवाईचे निर्देश

दूध आणि पनीरमधील भेसळीची गंभीर दखल घेत राज्य शासनानेही कठोर भूमिका घेतली आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेसळखोरांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याची माहिती आहे. अशा गुन्हेगारांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करून न्यायालयीन लढ्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञांची विशेष टीम नियुक्त करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांना रेकॉर्डवर आणणार; महसूलमंत्र्यांचे आदेश; कर्जमाफी, शासकीय योजनांचा मिळणार लाभ

मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस वेवर 'जीन्सराज'; महामार्गच बनला 'जीन्स सुकवण्याचा अड्डा'!

मुंबईत दरडींची टांगती तलवार! ७४ ठिकाणे धोकादायक तर ४६ ठिकाणे अतिधोकादायक

आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही; कराडमध्ये मनोज जरांगे-पाटील यांची गर्जना

मुंबईत नवी सुरुवात करण्याचे स्वप्न भंगले! घाटकोपर दरडीत शेख कुटुंबाचा करुण मृत्यू, चार दिवसांपूर्वीच मुंबईत आलेले कुटुंब उद्ध्वस्त