महाराष्ट्र

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या पित्याला अटक, मालवणीतील घटनेने संतापाची लाट

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका ५५ वर्षांच्या आरोपी पित्याला मालवणी पोलिसांनी अटक केली.

Swapnil S

मुंबई : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका ५५ वर्षांच्या आरोपी पित्याला मालवणी पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्याला विशेष सत्र न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती. यातील तक्रारदार महिला तिच्या ५५ वर्षांच्या पतीसह चार वर्षांच्या मुलीसोबत मालाडच्या मालवणी परिसरात राहते. तीन दिवसांपूर्वी पित्याने त्याच्याच मुलीशी अश्‍लील चाळे करून तिचा विनयभंग केला होता. त्यानंतर त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. त्यामुळे तिच्या गुप्त भागावर जखम झाली होती. कामासाठी बाहेर गेलेली पत्नी घरी आल्यानंतर तिचा पती तिच्या मुलीसोबत नग्नावस्थेत बसल्याचे दिसून आले होते. हा प्रकार विचित्र वाटल्याने तिने त्याला जाब विचारला. यावेळी आरोपीने पत्नीला शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. मुलीच्या चौकशीनंतर तिच्यावर तिच्या वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्याचे त्या महिलेला समजले. या घटनेने तिला प्रचंड मानसिक धक्का बसला. त्यामुळे तिने त्याच्याविरुद्ध मालवणी पोलिसांत तक्रार केली. या तक्रारीनंतर मालवणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेसह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच बुधवारी रात्री उशिरा त्याला त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला गुरुवारी दुपारी सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी