हर्षवर्धन सपकाळ (संग्रहित छायाचित्र ) एक्स @harshsapkal
महाराष्ट्र

नार्वेकरांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करा; हर्षवर्धन सपकाळ यांचे राज्य निवडणूक आयुक्तांना पत्र

महापालिका निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांच्या उमेदवारांवर हरप्रकारे दबाव आणून अर्ज मागे घेण्यास भाग पाडले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत.

Swapnil S

मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना अर्ज दाखल करताना धमकावल्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. नार्वेकर यांचे वर्तन आक्षेपार्ह व आदर्श आचारसंहितेचा भंग करणारे असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत तसेच त्यांच्या कार्यालयातील तब्बल ७० अधिकारी व कर्मचारी नार्वेकर यांचे नातेवाईक असलेल्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचारात सक्रिय भाग घेत आहेत, या सर्वांवरही आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

मुंबईतील कुलाबा मतदार संघातील प्रभाग क्रमांक २२५, २२६ व २२७ मधून राहुल नार्वेकर यांचे भाऊ मकरंद नार्वेकर, बहिण गौरवी शिवलकर व वहिनी हर्षदा नार्वेकर या तिघांनी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, अर्ज दाखल करताना राहुल नार्वेकर हे स्वतः उपस्थित होते. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असताना राहुल नार्वेकर यांनी पोलिसांच्या माध्यमातून भाजपा उमेदवारांच्या विरोधात अर्ज दाखल करणाऱ्या विरोधी पक्षांच्या उमेदवारांना धमकावले तसेच अर्ज भरण्यापासून रोखण्यात आले, अशा प्रकारे एका महत्वाच्या व संवैधानिक पदावरील

व्यक्तीने लोकशाहीचे धिंडवडे काढून निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणला आहे. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, असे सपकाळ म्हणाले. महापालिका निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांच्या उमेदवारांवर हरप्रकारे दबाव आणून अर्ज मागे घेण्यास भाग पाडले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करून घेऊ नये यासाठी प्रशासनावर दबाव आणला, विरोधी पक्षांच्या उमेदवारांना धमकावले हे अत्यंत गंभीर आहे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

राहुल नार्वेकर हे संवैधानिक पदावर आहेत, त्यांच्याकडून अशा पद्धतीने कायदा धाब्यावर बसून दडपशाहीचा मार्ग अवलंबणे लोकशाहीचा खून करण्यासारखे कृत्य आहे. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे आणि निवडणूक आयोगाच्या पाठीचा कणा मजबूत आहे हे दाखवून द्यावे आणि आयोगाने नार्वेकर यांच्यावर कारवाई करावी.
हर्षवर्धन सपकाळ, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष

Jharkhand Student Protest : भरती परीक्षांविरोधात आंदोलन; बॅरिकेड्स तोडून हजारो विद्यार्थ्यांचा विधानसभेवर मोर्चा, Video

किंमत तीच, वजन कमी! कच्च्या मालाच्या किमतीतील वाढीमुळे कंपन्यांपुढे पर्याय

पतीचा शोध घेत फ्लॅटवर पोहोचली, दुसऱ्या महिलेसोबत पाहताच राडा; दोघींची तुफान हाणामारी, VIDEO

कोल्हापूरची हद्दवाढ गरजेची; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

धावत्या ट्रेनमधून मोबाईल हिसकावला अन् प्रवाशाचा तोल गेला; CCTV मध्ये थरार कैद