महाराष्ट्र

रोहित पवारांविरोधात ‘एफआयआर’ दाखल; सरकारी कामकाजात अडथळा, पोलिसांशी गैरवर्तनाचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर ‘एफआयआर’ दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल झाली असून, त्यांच्यावर सरकारी कामकाजात अडथळा निर्माण करणे आणि पोलीस अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Swapnil S

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर ‘एफआयआर’ दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल झाली असून, त्यांच्यावर सरकारी कामकाजात अडथळा निर्माण करणे आणि पोलीस अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा गुन्हा नोंद होण्यामागे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक नितीन देशमुख यांच्या अटकेची पार्श्वभूमी आहे. दोन दिवसांपूर्वी विधिमंडळाच्या लॉबीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. त्यानंतर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना ताब्यात घेतले होते. नितीन देशमुख यांच्या अटकेविरोधात रोहित पवार हे थेट पोलिस ठाण्यात गेले होते आणि तिथे त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांशी वाद घातला होता.

विधिमंडळात झालेल्या गोंधळ झाल्यानंतर आमदार रोहित पवार आणि आमदार जितेंद्र आव्हाड हे पोलीस ठाण्यामध्ये आपल्या कार्यकर्त्याची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र, तो कार्यकर्ता सदरील पोलीस ठाण्यामध्ये नसल्याचे पोलिसांनी सांगितले. यावेळी रोहित पवार आणि पोलिसांमध्ये चांगली जुंपली होती. आमदार रोहित पवार यांचा पोलिसांना दमदाटी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

2006 Mumbai Local Train Blasts : हायकोर्टाच्या निर्णयाला महाराष्ट्र शासनाचे सुप्रीम कोर्टात आव्हान; २४ जुलैला सुनावणी

‘...तर तुमची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करू’; अमेरिकन सिनेटरचा भारताला इशारा, चीन आणि ब्राझिललाही धमकी

Kalyan : ''तुम्ही जरा थांबा'' बोलल्याने परप्रांतिय तरुणाकडून मराठी मुलीला बेदम मारहाण; शिवगाळ करत विनयभंग| Video

जगदीप धनखड यांच्या अचानक राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपतिपदाच्या शर्यतीत कोण? 'ही' नावे चर्चेत, महाराष्ट्रातील नेत्याचं नावही आघाडीवर

दिव्या देशमुख, कोनेरू हम्पीची ऐतिहासिक भरारी! महिलांच्या विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत भारताकडून पहिल्यांदाच 'अशी' कामगिरी