फडणवीसांकडून शिंदेंची पुन्हा कोंडी! माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या आरोग्य विभागाची चिरफाड; ३२०० कोटींच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती  Facebook - Tanaji Sawant
महाराष्ट्र

फडणवीसांकडून शिंदेंची पुन्हा कोंडी; माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या आरोग्य विभागाची चिरफाड, ३२०० कोटींच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती!

देवेंद्र फडणवीस राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात घेतलेल्या प्रकल्पाना, योजनांना कात्री लावण्यास सुरुवात केली आहे. शिंदेंना एकापाठोपाठ एक धक्के देत असतानाच, फडणवीस यांनी शिंदेंची पुन्हा एकदा कोंडी केली आहे. माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या आरोग्य विभागाची चौकशी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.

Swapnil S

मुंबई : देवेंद्र फडणवीस राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात घेतलेल्या प्रकल्पाना, योजनांना कात्री लावण्यास सुरुवात केली आहे. शिंदेंना एकापाठोपाठ एक धक्के देत असतानाच, फडणवीस यांनी शिंदेंची पुन्हा एकदा कोंडी केली आहे. माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या आरोग्य विभागाची चौकशी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. कोणत्या कामासाठी किती निधी, कुठल्या कामावर किती निधी खर्च केला, याची चौकशी होणार असून ३२०० कोटींच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती दिल्याचे समजते. हा शिंदेंसाठी मोठा धक्का असल्याचे मानले जाते.

सावंत यांच्या कार्यकाळातील ३,२०० कोटी रुपयांच्या निविदा प्रक्रियेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली असल्याचे महाराष्ट्राचे आरोग्य राज्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट केले. एखाद्या कामात अनियमितता आढळल्यास त्याची चौकशी होणे आवश्यक आहे. यात कोणत्याही पक्षाचा संबंध नाही, असे आबिटकर यांनी स्पष्ट केले.

शिंदेंच्या काळात काम कमी, घोटाळे जास्त - संजय राऊत

एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात कामे झाली नाही, केवळ घोटाळे झाले. त्यांच्या काळातील आरोग्यमंत्र्यांचे कमी काळात किती घोटाळे पुढे आले, हे आपल्याला माहिती आहे. शिंदेंच्या काळातील घोटाळे फडणवीसांनी बाहेर आणले तर स्वागतच आहे. जे घोटाळेबाज मंत्री आहेत त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यासाठी भाजपचा विरोध होता. त्यामध्ये त्या काळातील आरोग्यमंत्री एक आहेत. औषधांमध्ये जर घोटाळा होत असेल तर हे कसले राज्य, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर टीका केली.

Mumbai : गर्दीच्या वेळी फुटबोर्डवर उभे राहून प्रवास करणे म्हणजे निष्काळजीपणा नाही; मृताच्या नातेवाईकांना भरपाई देण्याचे आदेश

राज्यातील महानगरपालिकांच्या मतदार यादी कार्यक्रमात महत्त्वाचे बदल; आचारसंहिता २० डिसेंबरपर्यंत होणार लागू?

लाडक्या बहिणींची ओवाळणी लाटणाऱ्या भावांना दणका; राज्य सरकार पैसे परत घेणार; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा

IndiGo च्या विमान उड्डाणात १० टक्के कपात; गैरसोय टाळण्यासाठी केंद्राचा निर्णय

राज्यात आजपासून थंडीची लाट येणार; भारतीय हवामान विभागाचा इशारा