प्रदीप नाईक  एक्स @PawarSpeaks
महाराष्ट्र

माजी आमदार प्रदीप नाईक यांचे निधन

किनवट विधानसभा मतदारसंघातील ओबीसी नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांनी दि. १ जानेवारी रोजी हैदराबाद येथील किम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली.

Swapnil S

नांदेड : किनवट विधानसभा मतदारसंघातील ओबीसी नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांनी दि. १ जानेवारी रोजी हैदराबाद येथील किम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. २ जानेवारी रोजी किनवट तालुक्यातील दहेलीतांडा या मुळ गावी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. माजी आ. नाईकांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, नातवंड असा परिवार आहे.

प्रदीप नाईक यांनी राजकारणात सक्रीय सहभाग घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर १९९९ ची पहिली विधानसभा निवडणूक लढवली परंतु त्यात ते पराभूत झाले. तसा त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत भरभरून मताधिक्यांनी विजयी झाले. त्यानंतर २००९ आणि २०१४ अशी विजयाची हॅटट्रीक त्यांनी पूर्ण केली. मात्र २०१९ आणि २०२४ च्या निवडणुकीत सलग पराभव झाला.

एक लोकप्रिय नेतृत्व हरपले - खा. अशोक चव्हाण

किनवट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या निधनामुळे जिल्ह्यातील एक लोकप्रिय नेतृत्व हरपल्याची भावना माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. विधीमंडळात आम्ही सहकारी होतो. नांदेड जिल्ह्याच्या विकासासंदर्भात आम्ही एकत्र काम केले. ते नांदेड जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रातील एक जुनेजाणते व्यक्तीमत्व होते. निगर्वी व मितभाषी स्वभाव आणि लोकांची कामे करण्यासाठी असलेली तळमळ यातून त्यांचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला होता. त्यांचे अकस्मात निधन अतिशय धक्कादायक आहे, या शब्दांत खा. अशोक चव्हाण यांनी माजी आमदार प्रदीप नाईक यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Mumbai : गर्दीच्या वेळी फुटबोर्डवर उभे राहून प्रवास करणे म्हणजे निष्काळजीपणा नाही; मृताच्या नातेवाईकांना भरपाई देण्याचे आदेश

राज्यातील महानगरपालिकांच्या मतदार यादी कार्यक्रमात महत्त्वाचे बदल; आचारसंहिता २० डिसेंबरपर्यंत होणार लागू?

लाडक्या बहिणींची ओवाळणी लाटणाऱ्या भावांना दणका; राज्य सरकार पैसे परत घेणार; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा

IndiGo च्या विमान उड्डाणात १० टक्के कपात; गैरसोय टाळण्यासाठी केंद्राचा निर्णय

राज्यात आजपासून थंडीची लाट येणार; भारतीय हवामान विभागाचा इशारा