महाराष्ट्र

दगडफेक करणारे चौघे गजाआडl; एलसीबीची कारवाई

शहरातील व्हीनस कॉर्नर येथे बुधवारी केएमटी बसवर दगडफेक करणाऱ्या तीन आरोपींना अटक तर एक विधी संघर्षग्रस्त बालक ताब्यात घेण्यात आले आहे.

Swapnil S

कोल्हापूर : शहरातील व्हीनस कॉर्नर येथे बुधवारी केएमटी बसवर दगडफेक करणाऱ्या तीन आरोपींना अटक तर एक विधी संघर्षग्रस्त बालक ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली.

बुधवारी व्हीनस कॉर्नर येथील सिग्नलजवळ अज्ञात पाच ते सहा तरुणांनी केएमटी बसवर दगड मारून सुमारे २५,०००/- रुपयाचे नुकसान केले. बसचालक प्रकाश ज्ञानू झोरे यांनी शाहुपूरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

याप्रकरणी त्या अज्ञात तरुणांना अटक करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिल्या होत्या. त्यानंतर पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी आपल्या पथकाला योग्य ते मार्गदर्शन करत असताना हा गुन्हा अभिषेक घोडकेने त्याच्या साथीदारांनी मिळून केल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी सापळा रचून अभिषेक मंगेश घोडके (२६)आसिफ आमनुल्ला नायकवडी, (३०), ओंकार जगन्नाथ चौगुले, (२२) तसेच एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेतले आहे.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या तोंडाला काळे फासले! छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख भोवला

हंटर कमिशनने मांडलेले वास्तव व भूमिका

जनसुरक्षा नव्हे जनदडपशाही

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद