माळशेज घाटात सोसाट्याचा वारा; दुचाकीही डगमगली, VIDEO पाहून नेटकरी थक्क

माळशेज घाटातील जोरदार वाऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रचंड वाऱ्यामुळे दुचाकीस्वारांना वाहन थांबवावे लागल्याचे व्हिडिओत दिसत असून नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
माळशेज घाटात सोसाट्याचा वारा; दुचाकीही डगमगली, VIDEO पाहून नेटकरी थक्क
माळशेज घाटात सोसाट्याचा वारा; दुचाकीही डगमगली, VIDEO पाहून नेटकरी थक्क
Published on

पुणे : पावसाळ्यात निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या माळशेज घाटातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये इतक्या वेगाने वारे वाहताना दिसत आहेत की, दुचाकीस्वारांना वाहनाचा तोल सांभाळणे कठीण झाल्याने रस्त्याच्या कडेला थांबावे लागले.

व्हिडिओमध्ये नेमकं काय दिसतं?

व्हायरल व्हिडिओमध्ये घाटातून जोरदार वारे वाहत असल्याचे दिसते. काही दुचाकीस्वार वाहनाचा तोल जात असल्याने पुढे जाण्याऐवजी रस्त्याच्या कडेला थांबतात. तर एक व्यक्ती पायी चालण्याचा प्रयत्न करत असताना वाऱ्याच्या वेगामुळे त्याचा तोल जात असल्याचेही दिसून येते. जोरदार वाऱ्यामुळे पुढे जाण्यास त्याला मोठी कसरत करावी लागत असल्याचे व्हिडिओत पाहायला मिळते.

व्हायरल व्हिडिओ पाहा

सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी या वाऱ्याच्या वेगाला 'भयावह' आणि 'अविश्वसनीय' असे म्हटले आहे. तर काहींनी, "या वाऱ्यात कमी वजनाची व्यक्ती सहज उडून जाईल," अशा मजेशीर प्रतिक्रिया दिल्या. याशिवाय अनेकांनी पावसाळ्यात खराब हवामान असताना माळशेज घाटातून अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्लाही दिला आहे.

पावसाळ्यात माळशेज घाटात विशेष खबरदारी आवश्यक

पुणे-ठाणे सीमेवरील कल्याण-अहमदनगर महामार्ग (एनएच-६१) वरील माळशेज घाट हा पावसाळ्यातील लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक आहे. हिरव्यागार दऱ्या, धबधबे, धुक्याने वेढलेले डोंगर आणि निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक येथे येतात.

मात्र, पावसाळ्यात या घाटात मुसळधार पाऊस, दाट धुके आणि वेगवान वारे यामुळे वाहन चालवणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे प्रशासनाकडून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत असते. विशेषतः कमी वेगात वाहन चालवणे, कड्यांच्या परिसरात सेल्फी किंवा अनावश्यक थांबे टाळणे आणि हवामानाचा अंदाज पाहूनच प्रवास करण्याचा सल्ला दिला जातो.

दरम्यान, हा व्हिडिओ नेमका कधी चित्रित करण्यात आला, याची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. मात्र, मंगळवारपासून हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून पावसाळ्यातील माळशेज घाटातील बदलत्या हवामानाची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in