संग्रहित छायाचित्र पीटीआय
महाराष्ट्र

गडचिरोली-छत्तीसगड सीमेवर चार नक्षलवाद्यांचा खात्मा

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुका आणि छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागातील जंगलात पोलिसांशी झालेल्या चकमकीत शुक्रवारी ४ जहाल नक्षलवादी ठार झाले. त्यामध्ये २ पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे. हे नक्षलवादी उपकमांडर दर्जाचे असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Swapnil S

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुका आणि छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागातील जंगलात पोलिसांशी झालेल्या चकमकीत शुक्रवारी ४ जहाल नक्षलवादी ठार झाले. त्यामध्ये २ पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे. हे नक्षलवादी उपकमांडर दर्जाचे असल्याची प्राथमिक माहिती आहे.

दोन महिन्यांपूर्वीच भामरागड तालुका व छत्तीसगड सीमेवर कवंडे गावात गडचिरोली पोलिसांनी पोलीस मदत केंद्र सुरू केले आहे. त्या परिसरात नक्षलवादी दबा धरून असल्याचे कळताच सी-६० पथकाचे ३०० जवान आणि केंद्रीय राखीव दलाची एक तुकडी गुरुवारी दुपारी कवंडे आणि नेलगुंडा येथून इंद्रावती नदी परिसरात रवाना झाली होती.

शुक्रवारी सकाळी नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनीही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. जवळपास दोन तास गोळीबार सुरू होता. त्यानंतर घटनास्थळाची पाहणी केली असता ४ जहाल नक्षल्यांचे मृतदेह सापडले. त्यात दोन महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. छत्तीसगड पोलिसांनी माओवाद्यांचा देशातील सर्वोच्च नेता नंबाला केशव राव उर्फ गगन्ना बसवराजू याच्यासह २७ नक्षल्यांना कंठस्नान घातले होते. त्यानंतर घाबरलेल्या नक्षल्यांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. त्या अनुषंगानेच हे नक्षली कवंडे भागात आले. मात्र, गडचिरोली पोलिसांनी त्यांचा खात्मा केला.

चकमकीनंतर शस्त्रे जप्त

घटनास्थळी पोलिसांना एक स्वयंचलित रायफल, एक ३०३ रायफल, एक भरमार बंदूक, वॉकीटॉकी व अन्य साहित्य हाती लागले आहे. लवकरच मृत नक्षलवाद्यांची ओळख पटविली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video