PM
महाराष्ट्र

मुंबईत पूर्व द्रुतगति महामार्गावर कांजूरमार्ग भागात गोल्डन जॅकल - कोल्हा मृतावस्थेत 

पूर्व द्रुतगति महामार्ग म्हणजेच ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे हा मुंबई शेजारील नवी मुंबई आणि ठाणे यांना जोडणारा सर्वात वर्दळीचा रस्ता आहे

Swapnil S

मुंबई : पूर्व द्रुतगति महामार्गावर बुधवारी पहाटे गोल्डन जॅकेल (सोनेरी कोल्हा) या प्रजातीमधील एक प्रौढावस्थेतील कोल्हा मृतावस्थेत आढळला, असे वाईल्ड लाईफ वेल्फेअर ग्रुपच्या एका प्रतिनिधीने सांगितले. कांजुरमार्ग कोल्हा मिळाल्याचे समजताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले.

तेथील मूल्यमापनानुसार व परिस्थितीजन्य पुरावे पाहाता हा नर कोल्हा एखाद्या वाहनाला धडकला असावा व त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा असे रेस्किंक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअरचे संस्थापक आणि वन विभागाचे मानद वन्यजीव वॉर्डन पवन शर्मा यांनी सांगितले. यापेक्षा या प्राण्यामध्ये अन्य काही  गुंतागुंत आहे की नाही हे शोधण्यासाठी सविस्तर नेक्रोप्सी (पोस्टमार्टम) केली जाईल, असे ते म्हणाले.

पूर्व द्रुतगति महामार्ग  म्हणजेच ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे हा मुंबई शेजारील नवी मुंबई आणि ठाणे यांना जोडणारा सर्वात वर्दळीचा रस्ता आहे.ह े ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य आणि खारफुटीच्या जंगलांजवळ स्थित आहे, हे कोळ्यांचे नैसर्गिक अधिवास आहे, शर्मा म्हणाले.

ते म्हणाले, "प्राण्यांना वाचवण्यासाठी इतर वैज्ञानिक उपायांसह मोक्याच्या ठिकाणी (महामार्गावर) वन्यजीव क्रॉसिंग क्षेत्राशी संबंधित साइन बोर्ड लावण्याबाबत आपण संबंधित अधिकाऱ्यांशी बोलू.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन