महाराष्ट्र

सरकारने फोडाफोडीच्या राजकारणातून थोडी उसंत घेऊन जरांगेंच्या तब्येतीची दखल घ्यावी, मनसे आमदार पाटील यांचे ट्विट

मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण केले आहे.

Swapnil S

डोंबिवली : मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण केले आहे. उपोषणाला चार-पाच दिवस उलटले असून जरांगे यांनी उपचारास नकार दिला. या उपोषणाकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे तसेच सरकारने फोडाफोडीच्या राजकारणातून थोडी उसंत घेऊन जरांगेच्या तब्येतीची दखल घ्यावी, असे मनसे नेते तथा कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी ट्विट केले आहे.

मनोज जरांगे- पाटील यांनी उपोषणास बसल्याचा निर्णय घेतल्यानंतर सरकारने याची दाखल घेत यावर चर्चा करणे आवश्यक होते. मराठा आरक्षणासाठी लाखो-करोडो मराठा बांधवांसाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईत मोर्चा काढला होता. या मोर्च्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे-पाटील यांनी भेट घेऊन आश्वासन दिले होते. मात्र मराठा समाजासाठी आरक्षण मिळणे हे फक्त आश्वासन आहे का असा प्रश्न उपस्थित करत जरांगे-पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले. आता त्यांची प्रकृती ढासळत आहे.

यावर मनसे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी ट्विट करत सरकारने फोडाफोडीच्या राजकारणातून थोडी उसंत घेऊन सर्वप्रथम जरांगेंच्या तब्येतीची काळजी घ्यावी, अशी मागणी केली आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या अध्यादेशाची तात्काळ अंमलबजावणी करून, विशेष अधिवेशन बोलावून अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यात यावे,आंतरवाली सराटीसह राज्यभरात पोलिसांकडून दाखल करण्यात आलेल्या मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत, राज्यभरात शिंदे समितीच्या वतीने शोधण्यात आलेल्या मराठा कुणबी नोंदींची यादी संबंधित ग्रामपंचायतवर लावण्यात यावी अशी मागणी केली आहे.

समुद्रातील मासेमारीला लहान बोटी मुकणार; शासनाच्या निर्णयाला मच्छीमार कृती समितीचा विरोध

कामगारांच्या कामाचे तास वाढणार नाहीत; कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून स्पष्टीकरण

मुंबईत घुसले १४ दहशतवादी, ३४ वाहनांमध्ये मानवी बॉम्बस्फोट घडवणार; अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना धमकी

Mumbai : लालबागच्या राजाचे अंतिम दर्शन घ्यायचे आहे? मग 'या' मार्गावर द्या बाप्पाला शेवटचा निरोप!

“शशी थरूर यांना स्पर्धक मिळाला”; पंजाबच्या महापुराबाबत पठ्ठ्याचं तोडकं-मोडकं इंग्रजी ऐकून नेटकरी लोटपोट, Video व्हायरल