(आरोपी राकेश वाधवान, संग्रहित छायाचित्र)
महाराष्ट्र

पीएमसी बँक घोटाळा: राकेश वाधवान यांना हायकोर्टाचा दिलासा

वाधवान यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील हर्षद निंबाळकर यांनी यांनी युक्तिवाद केला

Swapnil S

मुंबई : पीएमसी बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी, एचडीआयएलचे प्रवर्तक राकेश वाधवान यांना सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या अंतरिम वैद्यकीय जामिनाची मुदत उच्च न्यायालयाने आणखी तीन आठवड्यांनी वाढवली. न्यायमूर्ती एस. एम. मोडक यांनी वाधवान यांना हा दिलासा दिला.

वाधवान यांच्या प्रकृतीत अद्याप सुधारणा झालेली नाही. जे. जे. रुग्णालयात सुविधा नसलेल्या वैद्यकीय चाचण्या केईएम, नायर किंवा खाजगी रुग्णालयातून करून घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यानुसार वाधवान यांनी पुढील तीन आठवड्यांत सर्व वैद्यकीय चाचण्या कराव्यात, असे न्यायालयाने म्हटले आहे. वाधवान यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील हर्षद निंबाळकर यांनी यांनी युक्तिवाद केला. सर्वोच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबर २०२३ रोजी वाधवान यांना अंतरिम वैद्यकीय जामीन मंजूर केला होता.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

ठाकरेंचे वलय संपले का?