महाराष्ट्र

मराठीपाठोपाठ हिंदीलाही घरघर ...

राज्याच्या शिक्षण विभागात विद्यार्थ्यांना पहिलीपासून हिंदी सक्तीवरून वातावरण तापले असतानाच मुंबई महापालिकेच्या शाळांचा टक्का घसरला असल्याचे समोर आले आहे. मागील १३ वर्षात हिंदी माध्यमातील ४७ टक्के विद्यार्थी घटले आहे. तसेच हिंदीच्या १९ शाळादेखील बंद झाल्या आहेत, तर तब्बल एक हजार २१२ शिक्षक देखील कमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Swapnil S

मुंबई : राज्याच्या शिक्षण विभागात विद्यार्थ्यांना पहिलीपासून हिंदी सक्तीवरून वातावरण तापले असतानाच मुंबई महापालिकेच्या शाळांचा टक्का घसरला असल्याचे समोर आले आहे. मागील १३ वर्षात हिंदी माध्यमातील ४७ टक्के विद्यार्थी घटले आहे. तसेच हिंदीच्या १९ शाळादेखील बंद झाल्या आहेत, तर तब्बल एक हजार २१२ शिक्षक देखील कमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई महापालिकेच्या मराठी गाळांची संख्या घटत असल्याचे पापूर्वीच समोर आले आहे. आता हिंदी शाळांबाबतही तोच प्रकार घडत असल्याने महापालिकेच्या शिक्षण विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तर, एकीकडे शिक्षणाचा दर्जा सुधारत असल्याच्या गमजा मारणारी महापालिका हिंदी तसेच मराठी माध्यमाची पटसंख्या वाढीसाठी काय प्रयत्न करत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

१३ वर्षांत विद्यार्थ्यांमध्ये ४७ टक्के घट

२०१२- १३ मध्ये मुंबईत हिंदीच्या २३४ शाळा होत्या आणि त्यामध्ये एकूण १ लाख २१ हजार ३८० विद्यार्थी आणि ३ हजार १३३ शिक्षक होते. मात्र, २०२४- २५ या वर्षात २१६ शाळा, ६४ हजार ५४९ विद्यार्थी आणि १९३१ शिक्षक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे १३ वर्षांच्या काळात विद्यार्थी ४७ टक्के तर शिक्षकांच्या प्रमाणात ४० टक्क्यांची घट झाली आहे.

दिल्लीत ५ मजली PG इमारत जमीनदोस्त; एकाचा मृत्यू, अनेक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

VIDEO : जखमी गोविंदांच्या उपचारावरून पालघरच्या रुग्णालयात कर्मचाऱ्याला मारहाण; शिवसेना आमदार पुत्रासह १७ जणांवर गुन्हा

जन्माष्टमीच्या रात्री संतापजनक प्रकार! मंदिरात जात असलेल्या १४ वर्षीय मुलीचं अपहरण अन्...

Mumbai : गणेशभक्तांना दिलासा; मध्यरात्रीपर्यंत धावणार ॲक्वा लाईन मेट्रो, जाणून घ्या वेळ

Delhi : उशिरा घरी परतल्याने कुटुंबीय रागावले; १३ वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल