Delhi : उशिरा घरी परतल्याने कुटुंबीय रागावले; १३ वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल

दिल्लीतील शाहदरा परिसरात उशिरा घरी परतल्यामुळे कुटुंबीयांनी रागावल्यानंतर १३ वर्षीय मुलीने टोकाचं पाऊल उचलल्याची घटना घडली. मुलीला रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केलं.
Delhi : उशिरा घरी परतल्याने कुटुंबीय रागावले; १३ वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
Delhi : उशिरा घरी परतल्याने कुटुंबीय रागावले; १३ वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

नवी दिल्ली : उशिरा घरी परतल्यामुळे कुटुंबीयांनी रागावल्यानंतर १३ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची घटना दिल्लीतील शाहदरा परिसरात घडली. शनिवारी पोलिसांनी याबाबत माहिती दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, कृष्णा नगरमधील राहत्या घरी मुलगी बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिच्या बहिणीने तिला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर खाली उतरवलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांना पीसीआर कॉल करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलीला तातडीने डॉ. हेडगेवार रुग्णालयात नेलं. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

उशिरा घरी परतल्याने कुटुंबीयांनी रागावलं

प्राथमिक चौकशीत मुलगी उशिरा घरी परतल्यामुळे कुटुंबीयांनी तिला रागावल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर काही वेळाने तिच्या बहिणीला ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. तिने आरडाओरडा केल्यानंतर मुलीला खाली उतरवून रुग्णालयात नेण्यात आलं.

Delhi : उशिरा घरी परतल्याने कुटुंबीय रागावले; १३ वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
Mumbai : धक्कादायक! SNDT कॉलेजच्या कराटे प्रशिक्षकावर अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्काराचा आरोप; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

बहिणीचा फोन उचलला नाही

मृत मुलीच्या बहिणीसोबत काम करणाऱ्या एका शेजाऱ्याने पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, रात्री सुमारे ९.३० वाजता तिच्या बहिणीने मुलीला फोन केला होता. अनेकदा फोन करूनही तिने कॉल उचलला नाही. त्यामुळे तिची बहीण घाईघाईने घरी परतली.

"तिने अनेकदा दरवाजा ठोठावला. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने आम्ही दरवाजा तोडला. त्यानंतर तिच्या बहिणीला ती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. तिनेच दोरी कापून तिला खाली उतरवलं," असं शेजाऱ्याने सांगितलं.

दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून पुढील तपास सुरू आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in