पुण्यातील ऐतिहासिक सारसबाग दोन दिवस बंद; पोलीस आयुक्तांचे प्रतिबंधात्मक आदेश, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी निर्णय 
महाराष्ट्र

पुण्यातील ऐतिहासिक सारसबाग दोन दिवस बंद; पोलीस आयुक्तांचे प्रतिबंधात्मक आदेश, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी निर्णय

पुणे शहर पोलीस आयुक्तांनी लागू केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक सारसबाग २८ व २९ तारखेला सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय पुणे महापालिकेच्या उद्यान विभागाने घेतला आहे.

Swapnil S

पुणे : पुणे शहर पोलीस आयुक्तांनी लागू केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक सारसबाग २८ व २९ तारखेला सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय पुणे महापालिकेच्या उद्यान विभागाने घेतला आहे.

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. गेल्या काही वर्षांतील अनुभव लक्षात घेता सारसबाग परिसरात दोन वेगवेगळ्या गटांमध्ये वाद आणि आरोप-प्रत्यारोप झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या.

विशेषतः दोन वर्षांपूर्वी काही मुस्लिम बांधव या परिसरात आले असताना हिंदुत्ववादी नेत्यांकडून परिसरातील वातावरण आणि स्वच्छतेबाबत आक्षेप घेण्यात आले होते. त्यानंतर सामाजिक तणाव निर्माण झाल्याची पार्श्वभूमी आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन पुणे पोलिसांच्या विशेष शाखेने कोणत्याही प्रकारची सामाजिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी सारसबाग दोन दिवस बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, बाग बंद ठेवण्याच्या कारणावरून काहीसा गोंधळ निर्माण झाला होता. महापौर मंजुषा नागपुरे यांनी सुरुवातीला ‘दुरुस्तीच्या कारणास्तव’ सारसबाग बंद राहणार असल्याची पोस्ट सोशल मीडियावर केली होती. मात्र काही वेळातच ती पोस्ट हटवून ‘सुरक्षेच्या कारणास्तव’ बाग बंद ठेवण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून तांत्रिक चूक झाली होती. जुन्या पोस्टमधील ‘दुरुस्ती’ संदर्भातील मजकूर तसाच राहिल्यामुळे हा गोंधळ निर्माण झाला. पुणे शहराच्या प्रथम नागरिक म्हणून जबाबदारीने वागत असून कोणतीही चुकीची माहिती देण्याचा उद्देश नाही.
मंजुषा नागपुरे, महापौर

तरुण तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; याचिका फेटाळली, दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

Mumbai : माझगावच्या गणपती मिरवणुकीवर अंडी फेकल्याचा आरोप; २२ वर्षीय तरुणाला अटक

Mumbai : बीकेसीतील 'एमसीए'च्या ५ उपाहारगृहांचे परवाने रद्द; FDA चा दणका; कारवाई सुरूच

Mumbai : चर्चगेट मेट्रो स्थानकातील लिफ्ट अचानक बंद; ६ प्रवासी अडकले

गर्लफ्रेंडने कारवर उमटवले ३४०० 'किस'; VIDEO व्हायरल होताच पोलिसांची कारवाई, तरुणाला ५,५०० रुपयांचा दंड