महाराष्ट्र

फराळ खायला हवा पण, आरोग्याची काळजी ही घ्यायची आहे, हो ना ...?

वैष्णवी माईंगडे

दिवाळी म्हटलं की, फराळ आला आणि फराळ म्हटलं कि, आरोग्याची काळजी वाटणं हे अगदी साहजिकच आहे. सणासुदीच्या दिवसात खाण्यापिण्यावर कंट्रोल ठेवणं म्हणजे अशक्य.... पण तरीही आपल्याला जर आपलं आरोग्य निरोगी ठेवायचं असेल तर मात्र या काही टिप्स लक्षात ठेवून त्या अमलात आणणंही तितकंच महत्वाचं आहे.

दिवाळीत सर्वांच्या घरी विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात. बरेच लोक बाहेरुन देखील फराळ घेऊन येतात. परंतु बाहेरून आणलेल्या फराळामध्ये वापरले जाणारे पदार्थ आरोग्यासाठी चांगले असतीलच असं नाही. त्याचबरोबर घरी बनवलेल्या पदार्थांमध्ये देखील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे आपल्याला अनेक रोगांचा सामना करावा लागू शकतो. औषधांचे नियमित सेवन करण्याऐवजी दैनंदिन जीवनात काही बदल करून आपण सर्व गोष्टींवर नियंत्रण मिळवू शकतो. त्यासाठी या काही टिप्स जाणून घेऊया...

पौष्टिक आहाराचे सेवन :- जास्त प्रमाणात तेलकट व तुपकट पदार्थ खाणे टाळा. आपल्या दैनंदिन जीवनात आपण फारसे असे पदार्थ खात नाही परंतु सणासुदीमध्ये अशा पदार्थांचे सेवन जास्त केले जाते, ते शक्यतो टाळा. दैनंदिन आहारात फळे, पालेभाज्या, कडधान्ये यांचा समाविष्ट करा.

फायबर व प्रोटीन चा समावेश :- रोजच्या आहारात फायबर व प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा, जसे कि दूध, मांस, अंडी, इ. या पदार्थांमुळे रक्तदाब कमी करण्यास मदत होते तसेच रक्तप्रवाह नियंत्रणात येतो.

आवडीचे पदार्थ जरूर खा पण...

आवडीचे पदार्थ आहेत म्हणून जास्त खाऊ नका, कमी प्रमाणात खा, कधीतरी खा, आणि चवीपुरतेच खा.

जेवणाच्या वेळा कटाक्षाने पाळा, जितक्या उशिरा जेवण कराल तितक्याच अपचन व वजन वाढण्याच्या शक्यता असतात. भरपूर पाणी प्या व थंड तसेच पॅकेज मधील अन्न खाणं टाळा. ताजे व शक्यतो घरचे अन्न खा.

नियमित व्यायाम करावा :- रोज न चुकता थोडा तरी व्यायाम करणे आवश्यक आहे. त्यामुळे आपले शरीर बळकट व मजबूत बनण्यास मदत होते.

व्यसनांच्या आहारी जाऊ नका :- धूम्रपान, मद्यपान यासारख्या व्यसनांच्या सेवनाने हृदयविकार, लिव्हर व किडनी यांवर परिणाम होण्याची शक्यता जास्त असते म्हणून अशा व्यसनांच्या आहारी जाणे टाळा. त्याचप्रमाणे मोबाईल फोन हे देखील एक व्यसनच आहे. मोबाईलमुळे डोळ्यांचे विकार उद्भवतात व त्यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो.  

तणावरहित आरोग्य, ताणतणाव कमी करण्यासाठी योगासने, मेडिटेशन करा, त्याचबरोबर आपल्या माणसांसोबत वेळ घालवा आणि निरोगी आयुष्य जगा. 

शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार, संजय निरुपम यांचा दावा

गँगरेपनंतर तलवारीनं कापली बोटे...बांसवाडा घटनेची हादरवून टाकणारी कहाणी, आरोपींनी गाठला क्रूरतेचा कळस

"नाहीतर देशातील हुकुमशाही सुरुच राहील..."खासदार अरविंद सावंतांची पंतप्रधान मोदींवर टीका

लष्करातील जवानाने EVM मध्ये फेरफार करण्यासाठी अंबादास दानवेंकडे मागितले २.५ कोटी!

Auto Sweep Service: बँकेत जाऊन फक्त 'हे' सांगा, बचत खात्यावर मिळेल तिप्पट व्याज