Pune : आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगार गणेश काळेला अटक; पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई 
महाराष्ट्र

Pune : आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगार गणेश काळेला अटक; पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई

दुबई आणि बँकॉक येथे बसून भारतातील हजारो नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारी सिंडिकेटचा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

Swapnil S

पुणे : दुबई आणि बँकॉक येथे बसून भारतातील हजारो नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारी सिंडिकेटचा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीचा मुख्य सूत्रधार सौरभ उर्फ गणेश बाळासो काळे याला थायलंडमधील बँकॉक विमानतळावर अटक करण्यात आली असून, ११ जून रोजी मुंबई विमानतळावर त्याला अधिकृतपणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. गणेश काळे हा थेट चीनमधील सायबर गुन्हेगारांच्या संपर्कात होता. भारतातील काही व्यक्तींकडून बँक खाती मिळवून त्यांचा वापर गुन्ह्यातील रक्कम गोळा करण्यासाठी केला जात होता. त्यानंतर हा काळा पैसा दुबईतून हाताळला जात असल्याचे तपासात समोर आले आहे.

टास्क फ्रॉड, शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट फ्रॉड आणि डिजिटल अरेस्ट यांसारख्या आधुनिक क्लृप्त्यांचा वापर करून आरोपी भारतीय नागरिकांची आर्थिक फसवणूक करत असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. यामध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली २ कोटी ६६ लाख रुपयांची फसवणूक, हिंजवडी पोलीस ठाण्यात १८ लाख रुपयांची फसवणूक तसेच देहूरोड पोलीस ठाण्यात ऑनलाइन टास्क फ्रॉडचा गुन्हा दाखल आहे.

Gwalior Accident : नवरात्रीत शीतला माता मंदिराबाहेर भीषण दुर्घटना! भरधाव ट्रकने भाविकांना चिरडलं; १४ जणांचा मृत्यू

Mumbai Crime: आई-वडील झोपेत असताना CSMT स्थानकातून चिमुकलीचं अपहरण; संशयित महिला CCTV मध्ये कैद

घटनादुरुस्ती विधेयकावर घाईने निर्णय नको; खर्गे यांचे पंतप्रधानांना पत्र, सीमांकन प्रस्तावांवर सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचीही मागणी

५ हजारांचे मूल्य कसे समजणार? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर पलटवार

Mumbai : पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय; दुर्गामूर्तीचे फोटो, व्हिडीओ काढण्यास मनाई