महाराष्ट्र

मराठा समाजाला आरक्षण मिळणार नसल्याचे जवळपास स्पष्ट - जरांगे

राज्य सरकार इतर मागासवर्ग समाजाचेच ऐकत आहे, त्यामुळे सरकारकडून मराठा समाजाला आरक्षण मिळणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे, असा आरोप मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी शुक्रवारी येथे केला.

Swapnil S

छत्रपती संभाजीनागर : राज्य सरकार इतर मागासवर्ग समाजाचेच ऐकत आहे, त्यामुळे सरकारकडून मराठा समाजाला आरक्षण मिळणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे, असा आरोप मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी शुक्रवारी येथे केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार मराठा समाजाचा अनादर करीत आहे, राज्य सरकार केवळ इतर मागासवर्ग नेत्यांना वेळ देऊन त्यांचेच ऐकत आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून मराठा समाजाला आरक्षण मिळणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे, त्यामुळे अशा सरकारला हटविण्याची गरज आहे, असे जरांगे म्हणाले.

विधानसभेच्या आगामी निवडणुकीत मराठा उमेदवार रिंगणात उतरविण्याबाबत २९ ऑगस्टनंतर निर्णय घेण्यात येईल, निवडणुकीत कोणाशीही आघाडी नसेल. अपक्ष उमेदवार रिंगणात उतरविण्याबाबत व उमेदवारांच्या सामाजिक समीकरणांबद्दल आम्ही विचार करू, असेही ते म्हणाले.

उद्यापर्यंत अतिवृष्टीचा इशारा! मुंबई, ठाणेमध्ये शाळा आजही बंद; राज्यात विविध दुर्घटनांमध्ये आत्तापर्यंत १३ जणांचा बळी, तर ४ जण जखमी

नाशिकला आज ढगफुटीचा इशारा

नागरिकांच्या मृत्यूनंतरच BMC जागी होणार का? मॅनहोल्सप्रकरणी मुंबई हायकोर्टाने फटकारले; पालिकेचे प्रतिज्ञापत्र केवळ धूळफेक

Taj Mahal Survey : ताजमहालप्रकरणी प्रतिज्ञापत्राचे आदेश

खंडाळा घाटात दरड कोसळली; १७ मेल एक्स्प्रेस गाड्या रद्द, ३१ रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलले