महाराष्ट्र

ऑटोमेशन तंत्रज्ञान लघू आणि मध्यम उद्योगांपर्यंत पोहोचणे गरजेचे - डॉ.सारस्वत

वृत्तसंस्था

ऑटोमेशन तंत्रज्ञान आणि विश्लेषण क्षमता ही मोठ्या उद्योगांबरोबरच लघू आणि मध्यम उद्योगांपर्यंत पोहोचायला हवी, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि नीती आयोगाचे सदस्य डॉ. विजयकुमार सारस्वत यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात असणाऱ्या सिफोरआयफोर (इंडस्ट्री ४. ओ) या लघू आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी व अद्यायावत तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी केंद्र सरकारच्या समर्थ उद्योग भारत उपक्रमांतर्गत उभारण्यात आलेल्या लॅबला डॉ.सारस्वत यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी प्रशांत श्रीनिवासन, उद्योगपती राहुल किर्लोस्कर, राजेंद्र देशपांडे, कृष्णा भोजकर, एसपीपीयू रिसर्च पार्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अरविंद शाळिग्राम, सिफोरआयफोरचे संचालक दत्तात्रय नवलगुंदकर आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी डॉ. सारस्वत म्हणाले, भारतीय परिस्थिती लक्षात घेता किफायशीर उपाय विकसित करण्यावर भर द्यायला हवा.

भर सभेत रडले रोहित पवार...सुप्रिया सुळेंच्या प्रचारसभेत नेमकं काय घडलं?

घसा बसलेला असतानाही शरद पवारांनी केलं भाषण, सुप्रिया सुळेंची सांगता सभा गाजवली

भारतीय महिला ऑस्ट्रेलिया, पाकिस्तानसह एकाच गटात; महिलांच्या टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर

बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना जमावानं जीव जाईपर्यंत मारलं, नेमका कुठं घडला प्रकार?

कांदा निर्यातबंदी उठवली! ४० टक्के निर्यातकरामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष कायम