जळगाव : प्रवाशांच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद देताना जळगाव विमानतळावरून जळगाव-मुंबई आणि जळगाव-अहमदाबाद दरम्यानची विमानसेवा आजपासून दररोज सुरू झाली आहे. यामुळे व्यापारी, उद्योजक तसेच सर्व प्रवाशांना मोठा लाभ होणार आहे.
आधी जळगाव-मुंबई सेवा आठवड्यात केवळ चार दिवस उपलब्ध होती. प्रवाशांच्या मागणीमुळे ही सेवा आता दररोज सुरू करण्यात आली आहे. तर, गेले दोन महिने बंद असलेली जळगाव-अहमदाबाद सेवा देखील आजपासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
या मार्गावर मुंबईहून येणारे विमान जळगाव मार्गे अहमदाबादला जाईल आणि परत जळगाववर येऊन मुंबईसाठी रवाना होईल. विमान कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे ६०% प्रवासी आधीपासून तिकीट बुक करत आहेत, त्यामुळे या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिवाळीच्या काळात या मार्गावर तिकीटे उपलब्ध नव्हती.
जळगाव विमानतळाचा फायदा जळगाव, धुळे, बुलढाणा जिल्ह्यांतील प्रवाशांना होत आहे. सद्यस्थितीत उडान योजनेअंतर्गत गोवा, पुणे, हैदराबाद, मुंबई, अहमदाबाद या शहरांसाठी सेवा सुरू असून त्यास चांगला प्रतिसाद मिळाला आहे. वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली, जयपूर आणि इंदूरसाठी विमानसेवेचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
जळगाव विमानतळाचे नवे वेळापत्रक जाहीर
गोवा-जळगाव
सोमवार ते रविवार (शनिवार वगळता): दुपारी १२:१० वाजता गोव्यातून उड्डाण, १:५०वाजता जळगाव पोहोचेल. शनिवार: दुपारी २:३० वाजता गोव्यातून उड्डाण, ४:२०वाजता जळगाव पोहोचेल.
जळगाव-गोवा
सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार आणि रविवार: सायंकाळी ५:३५ वाजता जळगावहून निघून ७:२० वाजता गोवा पोहोचेल. बुधवार: ६:०५ वाजता जळगावहून निघून ८:०५ वाजता गोवा पोहोचेल. शनिवार: रात्री ८:२५ वाजता जळगावहून उड्डाण, १०:२५ वाजता गोवा पोहोचेल.
जळगाव-पुणे
सोमवार ते रविवार (शनिवार वगळता): दुपारी २:१० वाजता जळगावहून निघून ३:३० वाजता पुणे पोहोचेल. शनिवार: सायंकाळी ४:४० वाजता जळगावहून निघून ६:० वाजता पुणे पोहोचेल.
पुणे-जळगाव
सोमवार ते रविवार (शनिवार वगळता): दुपारी ३:५० वाजता पुण्याहून निघून ५:१५वाजता जळगाव पोहोचेल. शनिवार: सायंकाळी ७:०० वाजता पुण्याहून निघून ८:०५ वाजता जळगाव पोहोचेल.
जळगाव-हैदराबाद
ही सेवा दररोज उपलब्ध: सायंकाळी ६:२५ वाजता जळगावहून निघून ८:४५ वाजता हैदराबाद पोहोचेल. हैदराबाद-जळगाव: सायंकाळी ४:२५ वाजता हैदराबादहून सुटून ६:०५ वाजता जळगावला पोहोचेल.
मुंबई-जळगाव-मुंबई
मंगळवार, गुरुवार, शनिवार: रात्री ८:०० वाजता मुंबईहून जळगाव येईल, ८:३५ वाजता पुन्हा मुंबईकडे परत उड्डाण.सोमवार, बुधवार, शुक्रवार, रविवार: दुपारी ४:२० वाजता मुंबईहून जळगाव पोहोचेल; ४:४५वाजता जळगावहून अहमदाबादला रवाना. परतीचे विमान: रात्री ८:०० वाजता जळगावात येऊन ८:२५ वाजता पुन्हा मुंबईकडे उड्डाण भरेल.