जळगाव गणेशोत्सव ‘डीजे’मुक्त करणार; सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळांचा ठराव 
महाराष्ट्र

जळगाव गणेशोत्सव ‘डीजे’मुक्त करणार; सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळांचा ठराव

शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव हा डीजेमुक्त राहणार आहे. ५३ गणेशोत्सव महामंडळांनी अशा प्रकारचा ठराव रविवारी केला असल्याची माहिती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष मुकुंद मेटकर यांनी दिली.

Swapnil S

जळगाव : शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव हा डीजेमुक्त राहणार आहे. ५३ गणेशोत्सव महामंडळांनी अशा प्रकारचा ठराव रविवारी केला असल्याची माहिती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष मुकुंद मेटकर यांनी दिली.

जळगावातील गणेशोत्सव हा शिस्तबद्ध व्हावा, यासाठी ३० वर्षापूर्वी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ अस्तिवात आले होते. गणेश मंडळांच्या विविध प्रश्नांबाबत महामंडळाचे ५०० वर कार्यकर्ते झटतात. गुलालमुक्त गणेशोत्सव ही संकल्पना या महामंडळाने शहरात सुरू केली व गणेश मिरवणुकीत गुलालाऐवजी फुलांच्या पाकळ्या उधळल्या जाऊ लागल्या. तीस वर्षानंतर महामंडळाचे अध्यक्ष म्हणून मुकुंद मेटकर तर कार्याध्यक्ष दीपक जोशी यांची निवड झाली आहे.

अशी होणार अंमलबजावणी

जळगावचा गणेशोत्सव डीजेमुक्त व्हावा म्हणून रविवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत ठराव करण्यात येऊन त्याची अंमलबजावणी होईल. या आधीदेखील डीजेमुक्त मिरवणुका निघत होत्या याकडे लक्ष मेटकर यांनी वेधले. गणेशोत्सवाचे नियोजन चोख व्हावे, यासाठी एकूण सहा समित्या स्थापन केल्या जाणार आहेत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक

Navi Mumbai : खारघर हाफ मॅरेथॉनमुळे उद्या वाहतुकीत बदल; पहाटे ५ वाजल्यापासून 'या' मार्गांवर निर्बंध, वाहतूक पोलिसांकडून सूचना

मुंबईत ATS ची मोठी कारवाई! माहीममधून तरुणाला अटक; जैश-ए-मोहम्मदशी संबंध असल्याचा संशय

Philippines Plane Crash : प्रशिक्षणादरम्यान हवाई दलाच्या दोन विमानांची धडक; चार वैमानिकांचा दुर्दैवी मृत्यू, Video

Video : हॉस्टेलमध्ये 'अँटी-सुसाइड' पंखे; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सुरतमधील विद्यापीठाचा महत्त्वाचा निर्णय