महाराष्ट्र

Jalgaon : ग्रामसभेत प्रश्न विचारणाऱ्या तरुणाला मारहाण; माजी सरपंचाविरोधात कारवाईची मागणी

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे गांधी जयंतीनिमित्त आयोजित विशेष ग्रामसभेत प्रश्न विचारल्यावरून तरुणाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, संबंधित माजी सरपंचावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Swapnil S

जळगाव : पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे गांधी जयंतीनिमित्त आयोजित विशेष ग्रामसभेत प्रश्न विचारल्यावरून तरुणाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, संबंधित माजी सरपंचावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

उबाठा शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्रातील युवासेना नेते विराज कावडिया यांनी याप्रकरणी पोलिसांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, ग्रामसभेत आर. एन. पाटील या युवकाने गावात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून ग्रामपंचायतीकडे फॉगिंग मशीन का नाही, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच मशीन उपलब्ध नसल्यास ग्रामस्थ वर्गणी करून ते घेऊ शकतात, असेही त्याने सांगितले.

ग्रामपंचायतीचा सरपंचपदाचा कार्यकाळ संपल्याने सध्या जारगाव येथे प्रशासक नियुक्त आहे. मात्र, ग्रामसभेला माजी सरपंच सुनील पाटील उपस्थित होते. तरुणाने प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी त्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर संबंधितांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : वरळीत महागडा भाडेकरार; दरमहा २८.५ लाख रुपयांचे भाडे

Mumbai : एनटीसी गिरणी कामगारांचा आत्महत्या करण्याचा इशारा; कामगारांना पगार व पेन्शनची प्रतीक्षा

Mumbai : अतिक्रमणांवर महापालिकेचा हातोडा; साकीनाका, पवईत 'पादचारी प्रथम' अभियानांतर्गत एल विभागाची कारवाई

यंदा व्याजदर वाढ? वाढत्या महागाईमुळे रिझर्व्ह बँक पतधोरणात बदल करणार

ICC World Cup 2027 : खेळाडूंच्या दुखापती, व्यस्त वेळापत्रकामुळे सर्वोत्तम संघ निवडणे कठीण - गिल