जळगाव जिल्ह्यात विहिरींच्या पाणीपातळीत मोठी घट; बोदवड तालुक्यात सर्वाधिक घसरण, १५ तालुक्यांमध्ये घसरण झाल्याची नोंद संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

जळगाव जिल्ह्यात विहिरींच्या पाणीपातळीत मोठी घट; बोदवड तालुक्यात सर्वाधिक घसरण, १५ तालुक्यांमध्ये घसरण झाल्याची नोंद

जळगाव जिल्ह्यात पाणी दुष्काळाची तीव्रता वाढण्याची चिन्हे दिसू लागली असून, भूजल सर्वेक्षणातून विहिरींच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे समोर आले आहे.

विजय पाठक

जळगाव : जिल्ह्यात पाणी दुष्काळाची तीव्रता वाढण्याची चिन्हे दिसू लागली असून, भूजल सर्वेक्षणातून विहिरींच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील एकाही तालुक्यात पाणीपातळीत वाढ झालेली नसून, सर्व १५ तालुक्यांमध्ये घसरण झाल्याची नोंद करण्यात आली आहे. बोदवड तालुक्यात सर्वाधिक २.९१ मीटरने पाणीपातळी घटली आहे. त्यामुळे आगामी उन्हाळ्यात, विशेषतः एप्रिल-मे महिन्यांत, पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भूजल सर्वेक्षण विभागातर्फे दर तीन महिन्यांनी जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील १६६ निरीक्षण विहिरींच्या माध्यमातून पाणीपातळीचा आढावा घेतला जातो. या सर्वेक्षणातून जिल्ह्यातील भूजलसाठ्याची चिंताजनक स्थिती समोर आली आहे. पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात असल्या, तरी प्रत्यक्षात त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र दिसत आहे.

पावसाळ्यापूर्वी नद्या, नाले, तलाव आणि विहिरींमधील गाळ काढण्याची मोहीम राबवली जात असे. मात्र, यंदा या कामांना अपेक्षित गांभीर्याने प्राधान्य दिले गेले नसल्याचा परिणाम जलसाठ्यांच्या पुनर्भरणावर झाल्याचे मानले जात आहे. दुसरीकडे, भूजलाचा मोठ्या प्रमाणावर उपसा सुरूच असल्याने पाणीपातळीवरील ताण वाढला आहे.

अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची शक्यता

उन्हाची तीव्रता वाढत जाईल, तसतशी भूजल पातळीत आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही भागांतील विहिरी कोरड्या पडण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना गती देणे, पावसाचे पाणी जमिनीत जिरवणे आणि भूजलाचा नियंत्रित वापर करणे आवश्यक आहे. अन्यथा, आगामी उन्हाळ्यात जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मोठी बातमी! ध्रुव राठीला दिल्ली पोलिसांनी घेतले ताब्यात

दिल्लीची नाकेबंदी, झुरळे आक्रमक; रेल्वे रद्द, मेट्रो, इंटरनेट सेवा बंद, ड्राय-डे जाहीर; परवानगी नाकारली तरी CJP आंदोलनावर ठाम

MPSC Protest Pune : प्रकृती बिघडली, तिघांचे उपोषण मागे

विप निवडणुकीत बंडोबांचे आव्हान; नागपूरच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये दुफळी, शिवसेना शिंदे गटाच्या मंगेश चिवटेंची माघार

जेन-झीला घाबरून सरकारची आणीबाणी; संपूर्ण देशच बंद करून टाका; CJP चा केंद्रावर हल्ला