महाराष्ट्र

जळगावात उष्माघाताचा बळी? लग्नावरून परतणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, तापमान ४५.४ अंशावर

जळगाव शहराचे तापमान हे ४५ अंशाच्या वर गेले असून जिल्हा उन्हाने भाजून निघत आहे. या वाढत्या तापमानामुळे बाहेर पडणे मुश्कील झाले आहे.

Krantee V. Kale

जळगाव : जळगाव शहराचे तापमान हे ४५ अंशाच्या वर गेले असून जिल्हा उन्हाने भाजून निघत आहे. या वाढत्या तापमानामुळे बाहेर पडणे मुश्कील झाले आहे. अशात सोमवारी सकाळी लोधू नामदेव पाटील यांचा मृतदेह अजिंठा चौफुली परिसरातील एसटी वर्कशॉपजवळ आढळून आला. शहरात उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील उष्माघाताची ही पहिली घटना आहे.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, लोधू नामदेव पाटील हे बोदवड तालुक्यातील हिंगणे येथे रविवारी सकाळी नातेवाईकांच्या लग्नासाठी गेले होते. दिवसभर कार्यक्रमात उपस्थित राहिल्यानंतर सायंकाळी सुमारे ७ वाजता त्यांनी अजिंठा चौफुली येथे बसमधून उतरल्याचे आणि घरी जात असल्याचे त्यांनी मुलीला फोनवरून सांगितले होते. मात्र, त्याच रात्री उशिरापर्यंत ते घरी पोहोचले नसल्याने नातेवाईकांनी रात्रभर त्यांचा परिसरात शोध घेतला. अखेर सोमवारी सकाळी त्यांचा मृतदेह एसटी वर्कशॉपजवळ आढळून आला. त्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. रविवारी दिवसभर उन्हात राहिल्यामुळे तीव्र उन्हाचा फटका त्यांना बसला असावा आणि त्यातून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज मृत वृद्धाचे नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट असून शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.

रविवारी जिल्ह्यात भुसावळ परिसरात तापमान ४६ अंशापर्यंत होते तर जिल्ह्यात ४५.३ पर्यंत होते सोमवारी जळगाव शहाचे तापमान जैन हिल्सवर ४५.४ नोंदवले गेले. या वाढत्या तापमानामुळे सकाळी बारा ते सायंकाही पाच पर्यंत रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत. जळगाव जिल्ह्यात तापमान तब्बल ४५.५ अंशांपर्यंत पोहोचले असून उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे.

जिल्ह्यात तापमान वाढते असताना लग्नाच्या या हंगामात दुपारी उशिरा लग्न लागत आहेत. मिरवणुका निघत आहेत. त्यात नाचण्याचे प्रमाण वाढते आहे वाढत्या तापमानाला हे घातक आहे. या वाढत्या तापमानात रक्तदाब वाढणे, शरीरातील पाण्याची कमतरता होणे आणि हदयविकाराचा घोका संभवतो. त्यामुळे उन्हात मिरवणुका टाळणे गरजेचे असून लग्नात तेलकट व चमचमीत पदार्थ खाणे शक्यतो टाळावे, असे मत जेष्ठ हदय भूलतज्ज्ञ डॉ. वर्षा वारके कुलकर्णी यांनी बोलताना व्यकत केले.

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग