Jalgaon : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यास लाचप्रकरणी अटक; सिमेंट रस्त्याच्या बिलासाठी मागितले १५ लाख  'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

Jalgaon : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यास लाचप्रकरणी अटक; सिमेंट रस्त्याच्या बिलासाठी मागितले १५ लाख

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगावच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता योगेश अभिमन्यू अहिरे याला ५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे.

Swapnil S

जळगाव : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगावच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता योगेश अभिमन्यू अहिरे याला ५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे. जळगाव शहरातील ८० लाख रुपयांच्या सिमेंट रस्त्याच्या कामाचे बिल मंजूर करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे सार्वजनिक बांधकाम विभागात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील वॉर्ड क्रमांक १४, विनोबानगर येथील सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामासाठी ८० लाख ३९ हजार ७४२ रुपये मंजूर करण्यात आले होते. हे काम २०२४ मध्ये मंजूर झाले असून २०२५ मध्ये मुदतीत पूर्ण झाले होते. मात्र निधीअभावी संबंधित ठेकेदाराला एकूण रकमेपैकी ५८ लाख रुपये मंजूर झाले होते, त्यापैकी सुमारे ४२ लाख रुपये ऑक्टोबर २०२५ मध्ये प्राप्त झाले होते. उर्वरित ३८ लाख ४९ हजार ७४२ रुपये अद्याप प्रलंबित होते.

उर्वरित बिल मंजुरीसाठी तक्रारदाराने सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता वर्ग-२ योगेश अहिरे यांची भेट घेतली असता, त्यांनी आधीच्या बिलाचे काम करून दिल्याचा मोबदला आणि उर्वरित बिल मंजूर करण्यासाठी १७ लाख रुपयांची मागणी केली. चर्चेनंतर ही रक्कम १५ लाख रुपयांवर ठरली. त्यापैकी ७ लाख ५० हजार रुपये स्वतःसाठी, तर उर्वरित ७ लाख ५० हजार रुपये वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी असल्याचे आरोपीने सांगितल्याचे समोर आले आहे. पहिला हप्ता ५ लाख रुपये, तर उर्वरित १० लाख रुपये काम पूर्ण झाल्यानंतर देण्याचे ठरले होते. शनिवारी तक्रारदाराला पंचांसमक्ष आरोपीने आपल्या कारमधील समोरील सीटखाली रक्कम ठेवण्यास सांगितले.

Mumbai : उद्या मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री जम्बो ब्लॉक, कोणत्या लोकल रद्द? जाणून घ्या

Mumbai CJP Protest : अभिनेता इम्रान खान पोलिसांच्या ताब्यात; व्हॅनमधून फोटो शेअर करत म्हणाला...

CJP Protest : आंदोलनाला हिंसक वळण; अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जींसह अनेक नेते पोलिसांच्या ताब्यात, Video

CJP Protest : अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; जंतर-मंतरवरील आंदोलनाची धुरा आता अजिंक्य शिंदेंकडे, Video

अभिजीत दिपके यांच्या आजीचं निधन; नातू दिल्लीत पोलिसांच्या ताब्यात, अंत्यसंस्कारासाठी गावी परतण्याची शक्यता