Jalna : संजय जाधवांवर मनोज जरांगे संतापले संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

Jalna : संजय जाधवांवर मनोज जरांगे संतापले

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी आक्रमक भूमिका घेतली आहे.

Swapnil S

जालना : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी आक्रमक भूमिका घेतली आहे. परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जरांगे पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. परभणी येथे शेतकऱ्यांच्या नावाखाली आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावरून त्यांनी बंडू जाधव यांना थेट इशारा दिला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी आरोप केला की, एकीकडे मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष करत आहे, मी स्वतः अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलो आहे, तर दुसरीकडे मराठा समाजाच्या नावाने राजकारण करणारे नेते कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत. परभणी येथे खासदार बंडू जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांच्या नावाखाली कार्यक्रम आयोजित केला असल्याचे सांगत जरांगेंनी त्यावर आक्षेप घेतला.

यावेळी जरांगे पाटील यांनी बंडू जाधव यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली. ‘बंडू जाधव, तू जो कार्यक्रम आयोजित केला आहेस, त्याचा परिणाम तुला आणि एकनाथ शिंदे यांना भोगावा लागेल,’ असा थेट इशारा त्यांनी दिला. मराठा समाज आरक्षणासाठी उपाशीपोटी आंदोलन करत असताना दुसरीकडे कार्यक्रमांचे आयोजन करून समाजाच्या भावनांशी खेळ केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

जरांगेंना भेटणार, २४ तासात निर्णय घेणार : उदय सामंत

छत्रपती संभाजी नगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरु झाले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. दरम्यान, यावर राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मनोज जरांगे पाटील यांची उद्या किंवा परवा मी भेट घेणार आहे. पुढच्या २४ तासात योग्य निर्णय घेऊ’ असे वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी केले आहे. शासन मराठा समाजाच्या मागण्यांसोबत आहे. मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी मी जरांगे यांच्या संपर्कामध्ये असल्याचे सामंत म्हणाले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

वाढता वाढे बाप्पाची उंची; भुलेश्वर दुर्घटनेनंतर उंच मूर्तींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, मुंबईत १०० हून अधिक उंच मूर्ती; साकीनाक्यात ४२ फुटी सर्वाधिक उंच मूर्ती

Nepal Floods : नेपाळच्या जलविद्युत बोगद्यांत ५३७ जण अडकले; बोगद्यांमधील बचावकार्याला वेग, भारत, चीन, कोरियाकडून मदत

दिल्लीला कांदा पोहोचला अन् लासलगावात दर घसरला; शेतकऱ्यांना पावणेतीन कोटींचा फटका

पंतप्रधान मोदींना उझबेकिस्तानचा सर्वोच्च सन्मान प्रदान

Nepal Floods : नेपाळमधून महाराष्ट्रातील ६९ नागरिकांची सुटका