महाराष्ट्र

Jalna OBC Sabha:"तुझ्यासारखा सासऱ्याच्या घरी तुकडा मोडत नाही", छगन भुजबळ यांचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल

नवशक्ती Web Desk

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास ओबीसी नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. मनोज जरांगे-पाटील मात्र मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी करत आहेत. असं असताना जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याला कडाडून विरोध करत मनोज जरांगे-पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. जरांगे विचारतात कुणाचं खाताय? अरे तुझं खातोय का?, असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.

यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, "हा छगन भुजबळ स्वकष्टाचं खातो. तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडा मोडत नाही. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही, मात्र ओबीसीतून आरक्षण देऊ नये. ५६ मराठा मोर्चे निघाले पण आम्ही कुणाला विरोध केला नाही. मात्र आम्ही कुणाचं घरं, दारं जाळली नाहीत."

ते पुढे म्हणाले की, ओबीसी आरक्षण हे घटनेनुसार आहे. ओबीसी आरक्षण म्हणजे गरीबी हटाव नाही. ओबीसीत सर्व जाती कायद्याने आल्या. तेव्हा आम्ही विरोध केला नाही. मात्र, मराठा समाज अवैधरित्या ओबीसी समाजात घुसत असल्याचं भुजबळ म्हणाले.

EWS मधून मराठा समाजाला जो लाभ मिळतो तो लाभ ओबीसींना देखील मिळत नाही. EWSचा ८५ टक्के लाभ मराठा समाज घेत असल्याचं देखील छगन भुजबळ यावेळी म्हणाले.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस